इतर

कण्हेरीवरील खवले किडे

Aspidiotus nerii

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • यजमानांच्या फांदी, पान आणि फळांवर बरेचसे पांढरे खवल्यांच्या काती दिसतात.
  • पान आणि फळ देखील काजळी बुरशीने आच्छादित होतात.
  • पाने वाळतात आणि अकाली गळतात आणि फळे विकृत आकाराची होतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

कण्हेरीवरील खवले किडे यजमान झाडाचे बरेच भाग खातात आणि लक्षणे प्रदुर्भावाच्या गंभीरते वर अवलंबुन असतात. यजमानांच्या फांदी, पान आणि फळांवर खवल्यांच्या बरेचशा पांढर्‍या काती (सुमारे २ मि.मी. व्यासाच्या) दिसणे हे पहिले लक्षण आहे. जसे ते उपद्रव करतात तसा मधाळ स्त्राव सोडतात जो फळ आणि पानांवर पडतो आणि त्यावर काजळी बुरशी वाढते. जास्त संक्रमण झाल्यास पाने वाळतात किंवा अकाली गळतात. कोंब वाळणे आणि फळे विकृत होणे हे खासकरुन टेबल ऑलिव्हच्या बाबतीत जास्त गंभीर आहे. एकूणच, झाडाचे जोम कमी होऊन उत्पादन आणि गुणवत्ता प्रभावित होऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पस अॅफिटस मेलिनस आणि अॅफिटस चिलेन्सिस आणि कोचिनेलिड भक्षक चिलोकोरस बायप्युसट्युस, र्हावयझोबियस लोफानटे आणि चिलोकोरस कुवाने हे कण्हेरीवरील खवले किड्यांच्या नैसर्गिक शत्रुत येतात. सुर्यप्रकाश भरपूर असलेल्या जागातील मोठ्या प्रमाणावरील संक्रमण चिलोकोरस कुवाने यशस्वीपणे नियंत्रित करु शकले. सेंद्रीय कीटकनाशके वनस्पती तेल, वनस्पती अर्क, फॅटी ऍसिड किंवा पायरेथ्रिनवर आधारित अल्प चरणी असलेल्या देखील वापरल्या जाऊ शकतात. वारंवार यांच्या वापराची गरज भासु शकते आणि पानांच्या खालच्या बाजुला मारले गेले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डेल्टामेथ्रिन, लँम्बडा-सिहॅलोथ्रिन किंवा सायपरमेथ्रिनसारखे सक्रिय घटक असलेले स्पर्शजन्य फवारण्या चांगल्या रीतीने पानाच्या खालच्या बाजुनेही मारले गेले तर थोडे नियंत्रण मिळु शकते. अंतर प्रवाही कीटकनाशक असेटामिप्रिड झाडाच्या भागात शोषले जाते आणि खवले रससोषण करत असताना त्यांच्या पोटात जाते. हे लक्षात ठेवा कि जरी खवले मेले तरी ते पान किंवा फांदीला चिकटुनच रहातात.

कशामुळे झाले

अॅस्पडियोटस नेरिल नावाच्या कण्हेरीवरील खवले किडींनी रससोषण केल्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. प्रौढ चपटे आणि लंबगोलाकार, सुमारे २ मि.मी. लांबीचे असुन त्यांच्या शरीरावर पांढुरट, मेणचट आवरण असते ज्यामुळे द्रव पदार्थ शरीराला चिकटत नाहीत. यांचा अपरिपक्व टप्पा (रांगणारे) आकाराने खूप बारीक असतो. दोघांनाही पानांच्या खालच्या बाजुला आणि फांदीवर खपलीसारखे चिकटुन रस शोषण करताना पाहिले जाऊ शकते. संक्रमित झाडाच्या सामग्रीमुळेच खवल्यांचा लांबदूर अंतरावर प्रसार होतो. स्थानीयरीत्या, रांगणारे खूप सक्रिय आणि गतीशील असतात, ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर स्थलांतरित होतात जेव्हा ते जवळच्या फांद्याद्वारे संपर्कात असतात. तापमान आणि आर्द्रता यांच्या जीवनचक्रावर महत्वाचा प्रभाव पाडते. ३० अंश सेल्शियसच्या तापमानात रांगणार्‍यांचा विकास पूर्णपणे बाधित होतो. ए. नेरिलला बहुधा ऑलिव्ह बागेतील कमी महत्वाचा उपद्रव मानण्यात येते. सफरचंद, आंबा, पाम, कण्हेर आणि लिंबुवर्गीय पिके इतर यजमानांत येतात.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • इतर झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होणार नाही अशा प्रकारे छाटणी करा.
  • खवल्यांच्या लक्षणांसाठी बागेचे निरीक्षण करा, जर संख्येने कमी असतील तर पानांवरुन खरवडुन काढा.
  • आयात केलेल्या लागवड सामग्रीला खवल्यांच्या उपस्थितीसाठी नीट तपासा.
  • संभावित संक्रमित सामग्रीचे वहन टाळा.
  • ब्रॅड स्पेक्ट्रम कीटकनाशकांचा वापर टाळा ज्यामुळे मित्र किड्यांना नुकसान होईल.
  • जास्त संक्रमित झाडांना काढुन निरोगी झाडे लावण्याचा विचार करा.
  • खवल्यांना मदत करणार्‍या मुंग्यांना सापळे किंवा बांध घालुन पकडा किंवा त्यांच्या चलनवलनात बाधा आणा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा