ऑलिव्ह

ऑलिव्हवरील पतंग

Prays oleae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानात बोगदे आणि पानाच्या खालच्या बाजुला विष्ठा दिसते.
  • फुलांना जाळ्याने एकत्र विणलेले दिसते.
  • अळ्यांनी आत शिरुन फळे खाल्ल्याने फ़ळे अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

वर्षाची कोणती वेळ आहे ह्यावरच लक्षणे बरीचशी अवलंबुन असतात. पाने खाणारी पिढी पानाच्या दोन्ही थरांमध्ये बोगदे पोखरते आणि बाहेर पडुन पानांच्या खालच्या बाजुला भरपूर विष्ठा सोडते. खाल्ल्याने चौकोनी खिडक्यांची नक्षीही काही वेळा पाहिली गेली आहे. फुले खाणारी पिढी अनेक फुलांना रेशमी जाळ्याने गुंफुन फुले खाते. खाण्याच्या क्रियेचे संकेत भरपूर दाणेरी विष्ठेतुन मिळतात. फळ खाणार्‍या पिढीतील अळ्या ऑलिव्ह झाडाच्या छोट्या फळांना उन्हाळ्याच्या सुरवातीलच पोखरतात आणि शरद ऋतुत लवकर यजमानातुन बाहेर पडतात जेव्हा त्यांची वाढ पूर्ण झालेली असते आणि मग जमिनीत कोषात जातात. फळांना झालेल्या नुकसानाच्या थेट परिणामी फळे अकाली गळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

भक्षक खूप संख्येने आहेत आणि त्यात सम्मिलित आहेत काही प्रजातींच्या मुंग्या, क्रिसोफिडस आणि भुंगे जी एका किंवा अनेक पिढ्यांची अंडी खातात. परजीवीत येतात अनेक प्रजातींचे वॅस्पस, जसे कि ट्रायकोग्रामा एव्हानेसेन्स आणि अॅगेनियास्पिस फ्युसिकॉलिस. बॅसिलस थुरिंगीएनसिस कुर्शाकीवर आधारीत उपायांच्या वापरानेही ऑलिव्ह पतंगांची संख्या अत्यंत कमी झालेली दिसते. प्रौढ पतंगांना पकडण्यासाठी कामगंध सापळे खूप प्रभावी आहेत आणि वसंत ऋतुच्या सुरवातीलाच लावले गेले पाहिजेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संभोगात बाधा आणणारे किंवा इथिलिनचा वापर करुन किडींचे नियंत्रण प्रभावीपणे केले जाऊ शकते. फुले खाणार्‍या अळ्यांच्या (पहिली पिढी) टप्प्यावर ऑर्गॅनोफॉस्फेटस संयुगे वापरल्यासही चांगले नियंत्रण मिळते.

कशामुळे झाले

प्रेस ओलिये प्रजातीच्या तीन वेगवेगळ्या पिढीतील अळ्यांमुळे कळ्या, पाने आणि फळांना नुकसान होते. प्रौढ पतंगांचे पुढचे पंख राखाडीसर असुन त्याला रुपेरी धातुसारखी झळ असते आणि अनेक काळे ठिपके असतात, जे काही प्रजातीत सापडत नाहीत. पाठचे पंख समान राखाडी असतात. कुठची पिढी आहे ह्यावर अळ्यांचा रंग आणि आकार अवलंबुन असतात. ह्यापैकी प्रत्येक ऑलिव्ह झाडाच्या विशिष्ट भागात विशेषता राखुन असतात. पहिल्या पिढीच्या अळ्या (पानांवरील पिढी) ही वसंत ऋतुच्या मध्यावर येते आणि कळ्यांच्या आतुन खाते आणि नंतरच्या टप्प्यावर फुलांतुन खाते. अळ्यांची दुसरी पिढी (फुलांवरील पिढी) उन्हाळ्याच्या सुरवातीला बाहेर येते आणि अत्यंत नुकसानदायक असते. माद्या फांदीजवळील छोट्या फळांवर अंडी घालतात आणि छोट्या अळ्या ऑलिव्हला पोखरुन खातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळ होते. अखेरीची पिढी जी फळातुन सुरु होते ती पानांवर स्थलांतरीत होते जिथे ती नागअळीसारखे पानांच्या थरांमध्ये पोखरते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील संभव क्वारंटाईन नियम तपासा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा लवचिक वाण लावा.
  • पी.
  • ओलियाच्या संक्रमण चिन्हांसाठी ऑलिव्ह झाडाचे नियमित निरीक्षण करत चला.
  • उपस्थित पतंगांची संख्या ठरविण्यासाठी कामगंध सापळे वापरा.
  • भक्षकांना न मारण्यासाठी विस्तृत श्रेणीच्या कीटकनाशकांचा वापर करु नका.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या अवशेषांचे दुसऱ्या बागांमध्ये परिवहन करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा