इतर

द्राक्षावरील टॉर्ट्रिक्स पतंग

Argyrotaenia ljungiana

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • अळ्या पानांचे मऊ भाग खातात ज्यामळे फक्त सांगाडे उरतात.
  • पाने आणि फळे जाळ्यात विणली जातात.
  • फळांना झालेल्या नुकसानामुळे संधीसाधू जंतु आकर्षित होतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

वसंत ऋतुत लवकर सुरवंट विकसित होणार्‍या फुलांच्या कळ्यांना आणि पानांच्या शिरांमधील मऊ भागांना खातात ज्यामुळे पानांचे फक्त सांगाडेच उरतात. फुलधारणेच्या काळात लवकर, जुन्या अळ्या फुलांच्या गुच्छात शिरतात आणि फळांच्या जवळपासच्या पुष्कळशा पानांना जाळ्यात विणतात. त्या फळांची साल ओरबाडु शकतात किंवा आत शिरुन गर खाऊ शकतात. पानांच्या आणि फळांच्या नुकसानाव्यतिरिक्त ह्या नुकसानामुळे संधीसाधू जंतु भागात घर करतात ज्यामुळे कूज होते. द्राक्षांच्या वेलींव्यतिरिक्त हे सफरचंद आणि पेयर झाडावरीलही सामान्यपणे आढळणारे उपद्रव आहेत. मॅलो, कर्ली डॉक, राई किंवा ल्युपिन हे देखील पर्यायी यजमानात येतात. ओटस आणि जवासारखी मळ्यातील आच्छादन पिकेही ह्या उपद्रवाला आकर्षित करतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रिकोग्रामा आणि एक्झॉचस निग्रिपॅल्पस सुबोब्स्कुरस सारखे परजीवी वॅस्पस तसेच कोळ्यांच्या काही जाती अळ्यांना खातात. बॅसिलस थुरिगिएनसिस आणि स्पिनोसॅडवर आधारीत सेंद्रिय मिश्रणे फवारे ही जैविक मान्यता व्यवस्थापन साधने आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेथोक्झिफेनोझाइड, क्लोरान्ट्रानिलिप्रोल, क्रायोलाइट आणि स्पिनेटोराम यापैकी एक तरी सक्रिय घटक असलेले फवारे टॉर्ट्रिक्स पतंगांविरुद्ध परिणामकारक आहेत.

कशामुळे झाले

पॉलिफॅगस जातीच्या आरगिरोटेनिया लुंजियानाच्या खाण्यामुळे पानांवर आणि फळांवर लक्षणे उमटतात. प्रौढांच्या पंखांचा पल्ला सुमारे १५ मि.मी. असतो आणि पुढचे पंख फिकट तपकिरी असुन त्यावर काही गडद आडवे पट्टे असतात आणि पाठचे पंख सुकलेल्या गवताच्या रंगाचे असतात. अळ्या थंडीच्या दिवस वेलीच्या सालीच्या खाचात, जमिनीवरील कचर्‍यात किंवा जाळे विणलेल्या पानात कोषावस्थेत जाऊन काढतात. किंवा त्या पर्यायी यजमानात विश्रांती घेतात. वसंत ऋतुत माद्या सुमारे ५०च्या संख्येने पुंजक्याने पानाच्या वरच्या पृष्ठभागावर अंडी घालतात. सुरवंट फिकट हिरवे, थोडे अर्धपारदर्शक आणि डोके पिवळसर तपकिरी असते. ते पहिल्यांदा पानाच्या शिरांमधील मऊ भाग खातात ज्याने पानांचे सांगाडेच उरतात. जुन्या अळ्या पानांची गुंडाळी करतात किंवा जाळ्यात विणतात आणि निवारा तयार करतात आणि कळ्या तसेच फळेही खातात. प्रतिवर्षी टॉर्ट्रिक्स पतंगांच्या सुमारे तीन पिढ्यांचे विविध टप्पे दिसतात आणि ह्या उपद्रवाच्या विकासाचे सगळे टप्पे वाढीच्या मोसमात उपस्थित असतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपद्रवासाठी मळ्यांचे नियमित निरीक्षण करा.
  • कामगंध सापळे वापरुन लोकसंख्या पातळी समजुन घ्या.
  • मळ्याला मोकळ्या काळात साफ करा.
  • सुकलेले द्राक्षांचे घड वेलींवरुन काढा आणि तण आणि जमिनीवरील घड काढुन टाका.
  • ह्याव्यतिरिक्त संक्रमण कमी असल्यास संक्रमित द्राक्षे आणि पाने काढुन टाका.
  • वसंत ऋतुत फुटवे येण्यापूर्वी किमान एक महिना आधी हे काम करा.
  • शक्य तितक्या लवकर काढणी केल्याने नुकसान थोडे कमी केले जाऊ शकते.
  • ब्रॉड स्केलची कीटनाशके वापरुन नैसर्गिक शत्रुंना मारु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा