पीच

भूमध्य प्रदेश प्रकारची फळ माशी

Ceratitis capitata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फळांवर जिथे माद्या अंडी घालतात तिथे टोचल्याच्या खुणा आढळून येतात.
  • प्रभावित फळे पिकून कुजतात किंवा अकाली गळतात.
  • संधीसाधु बुरशी टोचलेल्या जागांभोवती किंवा फळांच्या गळणार्‍या रसावर वाढतात.

मध्ये देखील मिळू शकते

14 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

पीच

लक्षणे

माशांनी हल्ला केलेल्या फळांवर माद्यांनी अंडी घालण्यासाठी निवडलेल्या जागी टोचल्याच्या खुणा दिसतात. प्रभावित फळे पिकून अकाली कुजतात, त्यातुन मधाळ रस स्त्रवतो आणि काहीवेळा खाली पडतो. टोचल्या जागी किंवा मधाळ रसावर संधीसाधु बुरशी वाढु शकते. माशांची छाती रुपेरी असते आणि त्यावर काळसर चिन्हे असतात, गव्हाळी ओटीपोट असते ज्यावर गडद पट्टे असतात आणि पारदर्शक पंखांवर फिकट तपकिरी पट्टे आणि राखाडी ठिपके असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी किडे आणि भक्षक वापरुन थोड्या प्रमाणावर जैविक नियंत्रण केले गेले आहे. सेराटिटिस कॅपिटाटाही बरेचशा परजीवी बुरशीच्या (ब्युव्हेरिया बॅसानिया) आणि काही सूत्रकृमींच्या श्रेणीला संवेदनशील आहे. पीकावर (किंवा फळावर) उपचाराचे परिणाम बहुतांशी अबलंबुन असतात. टोकाचे ऊष्ण उपचार गरम पाण्याच्या वाफेबरोबर (उदा. ४४ अंश सेल्शियस ८ तासांसाठी), गरम पाणी आणि जबरी ऊष्ण हवा तसेच थंड उपचार साठवण, वहन किंवा दोन्ही काळात केले जाऊ शकतात. तथापी, या सर्वांमुळे बहुतेक फळांचा ताजेपणा जास्त काळ टिकत नाही. पिकाचे संरक्षण करण्यासाठी स्पिनोसॅडची फवारण्या देखील केले जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फळांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकात फळांना बुडविणे ही मान्य असलेली पद्धत आहे. पिकांवर फवारण्या प्रतिबंधात्मक उपचार म्हणून देखील वापरल्या जाऊ शकतात पण हे कदाचित महाग असतील. फवारणीत प्रोटिन आमिष जे नर व मादास आकर्षित करतात ते योग्य किटकनाशक (मालेथिऑन) सोबत मिसळून एकत्र वापरणे ही अधिक स्वीकृत पद्धत आहे.

कशामुळे झाले

सेराटिटिस कॅपिटाटा नावाच्या मेडिटारेनियन माशीच्या अळीने खाण्यामुळे लक्षणे उद्भवतात. हिचे नाव मेडिटरेनियन असले तरी ती आफ्रिकेतील उपसहार्‍यात देखील आढळते आणि मेडिटारेनियन भागाव्यतिरिक्त, ही मध्य पूर्व, दक्षिण आणि मध्य अमेरीका आणि ऑस्ट्रेलियात देखील आढळते. माद्या पिकणार्‍या फळांची मऊ साल किंवा मण्यांना टोचते आणि टोचलेल्या छिद्रात सालाखाली अंडी घालते. ऊबल्यानंतर अळ्या फळांच्या आतील गर खातात आणि बहुधा गंभीर नुकसान करतात ज्यामुळे फळ खाण्यालायक रहात नाही. हा पॉलिफॅगस किडा आहे म्हणजे ह्याचे यजमान मोठ्या संख्येने आहेत ज्यांना तो प्रादुर्भाव करतो. जर आवडते झाड त्यांच्या जवळपास नसतील तर ते सहजपणे नविन यजमानांनाही संक्रमित करु शकतात. असाही पुरावा आहे कि ही संधीसाधु बुरशीचे वहन करु शकते जी हल्ला केलेल्या फळांवर वाढते. ही खूपच जास्त धाड घालणारी जात आहे जी बऱ्याच वेगवेगळ्या पर्यावरणात आणि तुलनेत टोकाच्या तापमानात देखील फोफावु शकते. फळमाशीच्या विकासासाठी उत्कृष्ट तापमान १०-३० अंश सेल्शियस असते.


प्रतिबंधक उपाय

  • फळबागामध्ये ही कीटक शोधण्याबाबत कृपया निरनिराळ्या क्वारंटाइन नियमांचे पालन करा.
  • किड्यांचे निरीक्षण करणारे किंवा कामगंध सापळे लावुन किड्यांना शोधा.
  • किडे सापडल्यास सक्षम अधिकार्‍यांना शक्य तितक्या लवकर कळवा व त्या भागातील संभावित संक्रमित फळांची वाहतुक करु नका.
  • निर्यातीसाठीच्या फळांना कागदाने किंवा पॉलिथिनने आच्छादित करा.
  • सर्व संक्रमित फळे दोन पिशव्या लावुन कचर्‍यात फेका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा