कापूस

बोंडावरील भुगे

Anthonomus grandis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कळ्यांवर बारीक छिद्र (टोचण्या) पडतात, ज्या नंतर तपकिरी होऊन गळतात.
  • फुले पिवळी पडतात आणि ती सुद्धा अकाली गळतात.
  • बोंडाची अशक्त वाढ होते किंवा ते बोंडे कुजतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

प्रौढ भुंगे हे नेहमी पाते आणि बोंडावर आणि क्वचितच पानांच्या देठावर आणि कोवळ्या वाढीवर उपद्रव करतात. कळ्यांवर बारीक छिद्र, अंडी घालण्यासाठी बारीक चामखिळीसारखी वाढ दिसणे ही प्रादुर्भावाची पहिली लक्षणे आहेत. कळ्यांना नुकसान झाले असता त्यांचा रंग खराब होतो आणि कळ्या, फुले आणि बारीक बोंडे (ज्यात अळ्या असतात) ते अकाली गळतात. मोठे छिद्र पडलेले बोंडे शक्यतो झाडावरच रहातात आणि उघडत नाहीत. वैकल्पिकरीत्या, त्यांवर संधीसाधु जीवजंतुंद्वारे आक्रमण केले जाऊ शकते ज्यामुळे ती कुजतात. पीक वाढीच्या काळात भुंग्यांनी पानांच्या देठांवर उपद्रव केल्याने ती पाने जरी फांदीला राहिली तरी करपून वाळतात, ह्या स्वभाव वैशिष्ट्याला "काळे झेंडे" असे म्हणतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

कॅटोलाकस ग्रँडिस सारख्या परजीवी वॅस्प्स सुद्धा भुंग्यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकतात. आणखी पुढे, जैविक कीटनाशक ज्यात बेउवेरिया बासीयाना बुरशी, बॅसिलस थुरिंजिनसिस जिवाणू किंवा चिलो इरिडिसेंट वायरस (सीआयव्ही) असेल ते ही वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. सिनथेटिक पॅरेथ्रॉइड कीटनाशक जसे कि डेल्टामेथ्रीन आणि फिप्रॉनिल वापरुन बोंडावरील भुंग्यांना आळा घालता येतो. दमट वातावरण या उपचारांची परिणामकारकता वाढविते. कामगंध सापळ्यांचा उपयोग भुंग्यांची संख्या तपासण्यासाठी व नियंत्रणासाठी (ह्यासोबत कीटनाशक किंवा बायो-एजंट वापरावे) केला जाऊ शकते.

कशामुळे झाले

बोंडावरील भुंग्याच्या, अँथॉनॉमस ग्रँडिस यांच्या प्रौढ आणि अळीमुळे हे नुकसान होते. प्रौढ भुंगे हे अंदाजे ६ मिलीमीटर लांबीचे असून त्यांची सोंड लांब आणि सडपातळ असते आणि त्यांचा रंग गडद, तपकिरी-लालसर ते तपकिरी किंवा काळसर असतो. ते कपाशीच्या शेताजवळील चांगला निचरा असणाऱ्या भागात आपली सुप्तावस्था घालवतात. हा सुप्तावस्थेतील काळ संपला कि साधारणत: वसंत ऋतुच्या सुमारास ते बाहेर येऊन कपाशीच्या शेतात शिरकाव करतात व उन्हाळा थेट अर्धा जाईपर्यंत तिथेच राहतात पण त्यांची बाहेर येण्याची सर्वात मोठी वेळ म्हणजे वसंत ऋतुच्या शेवटच्या बहरात असते ज्या काळात कपाशीची बोंडे विकसित होत असतात. माद्या या काळात वाढत्या कपाशीच्या बोंडात सहसा एका पात्यात एक अशी अंडी घालतात. त्यातुन निघणार्‍या फिकट पांढऱ्या, पाय नसलेल्या C-आकाराच्या अळ्या ह्या बोंडाला अंदाजे १० दिवसांपर्यंत खातात व नंतर तिथेच कोषावस्थेत जातात. अंड्यापासुन प्रौढ होण्यापर्यंतचे त्यांचे जीवन अंदाजे उन्हाळ्यात तीन अठवड्यांपर्यंतचे असते. बोंडावरील भुंग्यांच्या वार्षिक ८ ते १० पिढ्या होतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील शक्य असलेल्या वेगळे ठेवण्याच्या (क्वारंटाइन) नियमांची माहिती करुन घ्या.
  • मोसमात उशीरा लागवड करा जेणेकरून भुंग्यांच्या बळकट संख्येचा काळ टाळता येईल.
  • जर आपल्या क्षेत्रात उपलब्ध असतील (बाजारात बरेच आहेत) तर प्रतिकारक किंवा लवचिक वाणांची निवड करा.
  • बोंडावरील भुंग्याच्या उपद्रवाच्या लक्षणांसाठी नियमितपणे शेताचे निरीक्षण करत चला.
  • जास्त खत आणि पाणी देणे टाळा.
  • अपरिपक्व भुंग्यांचा काळ हा कोरडेपणा आणि गर्मीसाठी संवेदनात्मक असतो.
  • त्यामुळे पीक काढणी नंतर झाडांचे अवशेष काढुन टाकले पाहिजेत जेणेकरुन उरलेल्या अळ्या किंवा कोष ही प्रतिकुल परिस्थितीत जगणार नाहीत.
  • काढणीनंतर नांगरणी न करता फक्त झाडांचे अवशेष काढुन टाका.
  • प्रदुर्भावित झाडांच्या साहित्याची वाहतूक करु नये.

प्लँटिक्स डाऊनलोड करा