कापूस

कपाशीवरील तांबडे ढेकूण

Euschistus servus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • बोंडांवर वरवर डाग आणि चट्टे येतात.
  • सरकी आक्रसु शकतात आणि कोवळी बोंड गळुन पडतात.
  • चामखीळीसारखी वाढ बोंडाच्या आतील पाकळ्यावर सापडते.

मध्ये देखील मिळू शकते


कापूस

लक्षणे

कपाशीवरील तांबडे ढेकूण पाते आणि बोंडांवर आपली उपजीविका घालवतात. ते बहुधा जुन्या बोंडांवर हल्ला करतात ज्यांच्यावर वरवर डाग आणि चट्टे पडतात. अशा संसर्गित बोंडातील बिया आक्रसुन जातात आणि बोंड उघडत नाही. जर नविन बोंडांना नुकसान झाले, तर ते गळुन पडु शकतात. बाहेरील व्रण हे बोंडाच्या आतील चामखीळीसारख्या वाढीशी संबंधित आहेत, खास करुन आतली कार्पल भिंत जिथे घुसपेठ झालीय. बियांना प्रादुर्भाव झाल्याने कपाशीच्या उत्पादनात घट होते आणि संसर्गित जागेतील कापसावर डाग येतात, ज्यामुळे कापसाची प्रत कमी होऊन नुकसान होते. तांबड्या ढेकणांमुळे बोंड कुजविणाऱ्या संधिसाधु जीवजंतुंचाही संसर्ग होतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी ताचिनिड माशा आणि गांधीलमाशा तांबड्या ढेकणाच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालतात आणि त्यांच्या अळ्या नंतर उबवुन निघणार्‍या अळ्यांना खातात. पक्षी आणि कोळ्यांमुळे सुद्धा संसर्ग कमी होऊ शकतो. युकालिप्टस उरोग्रेंडिसचे तेल प्रौढ आणि त्यांच्या पिल्लांना घातक असते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. रोपाचे नुकसान वाचविण्यासाठी आणि थोडे नियंत्रण ठेवण्यासाठी पायरेथ्रॉइड गटातील किटकनाशाकांसोबत बीज प्रक्रिया करा. डायक्रोटोफॉस आणि बायफेनथ्रीनवर आधारीत कीटनाशकांची फवारणी केल्यास यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

कशामुळे झाले

यातील प्रौढ खंदकाच्या काठावर, कुंपणावर, फळ्यांखाली आणि सुकलेल्या तणांखाली, भुसभुशीत जमिनीत, दगडांखाली आणि झाडांच्या बुंध्यांत सुप्तपणे रहातात. वसंत ऋतुच्या पहिल्या काही दिवसातच जेव्हा तापमान २१ डिग्री सेल्शियसवर जाते तेव्हा ते कार्यरत होतात. साधारणत: पहिली पिढी जंगली यजमानांवर वाढते, तर दुसरी पिढी मात्र लागवड केलेल्या पिकांमध्ये वाढते. प्रत्येक मादी सहसा एका वेळी १८ अंडी देते, १०० दिवसात सरासरी ६० अंडी देते. प्रौढ चांगले उडु शकतात आणि चटाचट तण आणि इतर यजमानांतुन फिरतात.


प्रतिबंधक उपाय

  • या किडींची उच्च संख्या टाळण्यासाठी लवकर लागवड करणे सुनिश्चित करा.
  • शेतावर उपद्रवाच्या लक्षणांसाठी नियमित लक्ष ठेवुन तण काढत रहा.
  • दोन शेतांमध्ये अडथळे घातल्यास ह्या किड्यांचे स्थलांतर कमी होते.
  • काढणीनंतर ताबडतोब झाडांचे अवशेष नष्ट करा.
  • मशागत न केल्यामुळे किंवा अच्छादनामुळे संसर्गाची जोखिम वाढते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा