इतर

लेझर नावाची बुडखा कांडी किड

Elasmopalpus lignosellus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवंट ताटे, कणिस आणि फांद्यांच्या बुडाजवळ पोखरतात.
  • फांद्यांच्या आतील भाग खाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विष्ठा सोडतात जी आत शिरण्याच्या मार्गावरही दिसते (ह्या लक्षणाला मृत गाभा म्हणतात).
  • झाडे बहुधा विकृत आकाराची आणि खुजी होत असुन कणसांच्या संख्येत मोठी घट होते.
  • झाड मरगळणे आणि वाळणे तसेच काही वेळा आडवी होणे ही या उपद्रवाची इतर काही लक्षणे आहेत.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

एलास्मोपाल्पस लिग्नोसेल्लस जातीचे सुरवंट मक्याच्या पानांना खातात परंतु जास्त नुकसान हे रोपाच्या उशिराच्या काळात होते जेव्हा ते खोडाच्या आणि फांद्याच्या बुडाजवळ पोखरतात. फांद्यांच्या आतील भाग खाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विष्ठा सोडतात जी आत शिरण्याच्या मार्गावरही दिसते. ह्या गटाच्या लक्षणांना मृत गाभा असे म्हटले जाते. रोपे बहुधा विकृत आकाराची आणि खुजी असतात तसेच कणसेही फारच कमी लागतात. पाणी आणि पोषकांचे वहन न झाल्यामुळे रोपे मरगळतात आणि सुकतात तसेच काही वेळा आडवी होणे किंवा वाळणे देखील पाहिले गेले आहे. बुडखा कांडी किडीने स्वत:ला गरम, कोरड्या हवामानासाठीही बदलुन घेतले आहे आणि बहुधा ऊबदार, कोरड्या हवामानानंतर अधिक हानिकारक असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बरेच भक्षक आहेत पण अळ्या फांद्याच्या आणि खोडाच्या आत सुरक्षित रहात असल्याने प्रभावी नियंत्रण कठिण होते. काही वेळा, ऑर्गिलस एलॅस्मोपाल्पी आणि केलोनस एलॅस्मोपाल्पी जातीचे परजीवी ब्रॅकोनिड वॅस्पस लोकसंख्येचे चलन बदलतात. न्युक्लियर पोलिहेड्रोसिस विषाणू (एनपीव्ही) अॅस्पेर्गिलस फ्लाव्हस आणि ब्युव्हेरिया बॅसियाना किंवा बॅसिलस थुरिंगिएनसिस जिवाणूवर आधारीत जैव कीटनाशकांचा वापरही संक्रमाणस नियंत्रित करु शकतो.

रासायनिक नियंत्रण

अळ्यांच्या नियंत्रणासाठी चरात दाणेदार किंवा द्रव स्वरूपातील कीटनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. मक्यात उपचाराचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे टियोडिकार्ब आणि फ्युरेशिओकार्ब असणार्‍या उत्पादांचे उपचार करणे होय. क्लोरपायरीफॉस आणि टियोडिकार्बच्या फवारणीने देखील प्रादुर्भावाचे नियंत्रण केले जाऊ शकते.

कशामुळे झाले

पतंग स्थानिक आणि पर्यावरणाच्या घटकांप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचा असतो. नराचे पुढचे पंख तपकिरीसर पिवळे असतात आणि त्यावर विखुरलेले गडद ठिपके असतात जे कडेला एकत्रित असतात, जिथे अजुन गडद रंगाचा रुंद पट्टा देखील दिसतो. माद्यांचे पुढील पंख कोळशासारखे काळे असतात आणि त्यावर लालसर किंवा जांभळट खवले असतात. दोघांचेही पाठचे पंख पारदर्शक चंदेरी छटेचे असतात. माद्या हिरवट अंडी कोरड्या जमिनीच्या वरच्या कोरड्या थराखाली किंवा खोडाच्या बुडाशी घालते अळ्या सडपातळ आणि केसाळ असतात तसेच जांभळे आणि पांढरे आडवे पट्टे पूर्ण शरीराभोवती आलटुनपालटुन असतात. जर त्यांना त्रास दिला तर त्या चांगल्याच वळवळतात. जमिनीच्या पृष्ठभागाखाली केलेल्या रेशमीसर जाळ्याच्या बोगद्यात किंवा छिद्रात रहातात आणि मुळे तसेच झाडांचे आतील भाग खाण्यासाठी बाहेर येतात. कोरडी वर्ष किंवा चांगला निचरा असलेली वालुकामय जमिन यांच्यासाठी खासकरुन फायदेशीर असते. शेताच्या क्षमतेच्या ८०% सिंचन केल्यास यांच्या लोकसंख्येचे नियंत्रण करण्यात मदतच मिळते.


प्रतिबंधक उपाय

  • उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • जमिनीची आर्द्रता नियमित सिंचनाने स्थिर राखा.
  • प्रकाश किंवा कामगंध सापळे वापरुन पतंगांना पकडा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि पर्यायी यजमान काढुन टाका.
  • पेरणीच्या अगोदर खोल नांगरुन जमिनीतल अळ्यांचे जीवनचक्र खंडित करा.
  • जैव अवशेष शेतातच ठेवा ज्यामुळे अळ्या त्याकडे आकर्षित होऊन त्यांना खातील आणि कोवळी रोपे वाचतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा