उडीद आणि मूग

सोयाबीनवरील उंटअळी

Chrysodeixis includens

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर खाण्यामुळे होणार्‍या खिडक्या आढळतात.
  • पानाच्या कडेपासुन उपाद्रव केल्यामुळे ओबडधोबड छिद्रे आणि फाटलेल्या कडा दिसतात. प्रौढ पतंग गडद तपकिरी असुन त्यांच्या पुढच्या पंखांवर चमचमणारे लालसर ते सोनेरी विखुरलेले ठिपके असतात.

मध्ये देखील मिळू शकते


उडीद आणि मूग

लक्षणे

झाडाचे भाग सुरवंटांनी खाल्ल्याने नुकसान होते. तरुण अळ्या प्रथम पानाची खालची बाजु खातात आणि वरची बाजु तशीच सोडतात ज्यामुळे पारदर्शक खिडकीसारखी खाल्ल्याची सौंरचना दिसते ज्याला ‘खाण्यामुळे होणाऱ्या खिडक्या’ असे म्हटले जाते. प्रौढ अळ्या संपूर्ण पानावर त्याच्या कडेपासुन, मोठ्या शीरा टाळुन ताव मारतात ज्यामुळे ओबडधोबड छिद्रे आणि पानांच्या फाटलेल्या कडा दिसतात. झाडाच्या खालच्या भागातुन खाल्ल्यामुळे, असामान्य पानगळ सौरचना, झाडीच्या आत आणि खालून वर व बाहेरील झाडीत दिसते. ते क्वचितच फुल किंवा शेंगांवर हल्ला करतात. तथापि, झाडाची पानगळ झाल्यास अळ्या बहुधा सोयाबीनच्या शेंगांनाही खायला सुरु करतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

सोयाबीनवरील उंटअळीला खाणार्‍या परजीवी वॅस्पस नैसर्गिक भक्षकात येतात : कॉपिडोसोमा ट्रंकॅटेलम, कँपोलेटिस सोनोरेन्सिस, कॅसिनारिया प्लुसिये, मेसोकोरस डिस्किटेरगस आणि मायक्रोचारोप्स बायमॅक्युलाटा, कोटेशिया ग्रेनाडेनिस आणि परजीवा माशा व्होरिया रुरालिस, पाटेलोआ सिमिलिस तसेच युफोरोसेरा आणि लेस्पेशियाच्या काही प्रजाती. बॅक्युलोव्हायरसेस, बॅसिलस थुरिंगिएनसिस किंवा स्पिनोसॅडवर आधारीत उत्पाद उंटअळीच्या नियंत्रणासाठी वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर त्याचा वापर करा. फक्त एकट्याच सोयाबीनवरील उंटअळ्या असल्यास त्याचा जास्त धोका पिकाला नसतो पण संभावित पानगळ करविणार्‍या किड्यांमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन व्यवस्थापन निर्णय घ्यावेत. जर फुलोर्‍या आधीची पानगळ ४०%, फुलोरा आणि शेंगा भरताना २०%, किंवा शेंगा भरताना ते काढणीपर्यंत जर ३५% होत असेल तर उपचारांची शिफारस केली जाते. कीटनाशक ज्यात इन्डोक्साकार्ब, मेथॉक्झीफेनोझॉइड आणि स्पिनेटोरॅम आहे त्याचा वापर केला जाऊ शकतो. पायरेथ्रॉइड कुटुंबातील कीटनाशके वापरणे टाळा कारण याचा प्रतिकार निर्माण झाल्याचे तपशील आहेत.

कशामुळे झाले

स्युडोप्लुशिया इनक्लुडेन्स नावाच्या सोयाबीनच्या उंटअळीमुळे नुकसान होते. पतंग गडद तपकिरी असुन त्यांच्या पुढच्या पंखांवर चमचमणारे लालसर ते सोनेरी विखुरलेले ठिपके असतात. दोन रुपेरी चिन्हे मध्यावर स्पष्ट दिसतात. मादी झाडाच्या खालच्या आणि झाडीच्या आतल्या बाजुच्या पानांच्या खालच्या बाजुला अंडी घालते. अळ्या हिरव्या रंगाच्या असून त्यांच्या बगलेत आणि पाठीवर पांढरे पट्टे असतात. अळीचे वैशिष्ट म्हणजे त्यांना खास पायाच्या तीन जोड्या असून, शरीरात (२ शरीराच्या मध्याभागी आणि १ शेपटीवर) अनियमितपणे वितरीत असतात. या व्यवस्थेमुळे चालताना त्या पोक काढून चालतात म्हणुनत त्यांना 'उंटअळी' हे सामान्य नाव आहे. पानाच्या खालच्या बाजुला कोष विणुन कोषावस्थेत जातात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास सहनशील किंवा प्रतिकारक वाण निवडा.
  • मोठे नुकसान टाळण्यासाठी लवकर लागवड करा आणि लवकर तयार होणारे वाण लावा.
  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी विशेषतः खालच्या झाडीचे निरीक्षण करा.
  • अळी किंवा प्रभावित झाडे काढुन नष्ट करा.
  • मोसमात झाडे निरोगी आणि जोमदार ठेवा.
  • मित्र किड्यांवर प्रभाव पडु नये म्हणुन कीटनाशकांचा वापर नियंत्रित ठेवा.
  • अळ्यांना खाणार्‍या पक्षांसाठी मोकळी जागा आणि पक्षीथांबे उभारा.
  • पतंगांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी सापळे लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा