इतर

तृण धान्याच्या पानांवरील भूंगेरे

Oulema melanopus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पातळ, लांब, पांढर्‍या रेषा पानांच्या वरच्या त्वचेवर दिसतात.
  • दुरुन पाहिल्यास शेताचा प्रभावित भाग पिकलेला आणि जुना दिसतो पण बहुधा नुकसान जास्त गंभीर नसते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

बिटल्सना ओट्स, जव, आणि राय सारखी धान्य फार आवडतात पण त्याचे आवडते यजमान गहू आहेत. मका, ज्वारी आणि गवतासारखे ह्याचे पर्यायी यजमानही पुष्कळ आहेत. अळ्या पानाच्या वरच्या भागाची त्वचा खातात आणि त्यामुळे पूर्ण जीवनचक्राला मुख्य नुकसान करतात. त्यांच्या खाण्याचे वैशिष्ट्य आहे कि पानांचे भाग खालच्या भागापर्यंत खातात ज्यामुळे पातळ, लांब, पांढरे व्रण किंवा रेषा दिसतात, जर संक्रमण खूपच जास्त झाले असेल तर रेषांची संख्याही खूप जास्त असते. तरीपण प्रौढ बीटल्स खात-खात इतर रोपांवर किंवा शेतात पसरतात, म्हणजे एकाच शेताला गंभीर नुकसान क्वचितच होते. दुरुन पाहिले असता, शेताचा प्रभावित भाग पिकल्यासारखा आणि जुना दिसतो पण एकुण भागाच्या ४०%वर नुकसान जात नाही. काही धान्य लागवडीच्या भागात हे बीटल्स पिकावरील महत्वाचे आणि कायमचे उपद्रव आहेत.

Recommendations

जैविक नियंत्रण

स्टेनेर्नेमा जातीचे काही सूत्रकृमीही जमिनीत विश्रांती घेत असलेल्या प्रौढांवर हल्ला करतात, ज्यामुळे ते वसंतात परत येऊ शकत नाहीत. तरीपण त्यांची परिणामकारकता ही तापमानावर अवलंबुन असते. काही लेडीबग्जही अळ्या आणि अंड्यांना खातात. ताचिनिड माशी ह्यालोमायोडस ट्रायन्ग्युलिफर माशाही प्रौढांना खातातआणि ओ. मेलानोपसच्या संख्या नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध आहेत. डायापारसिस कारनिफर, लेमोफॅगस कर्टिस आणि टेट्रास्टिचस जुलिस हे परजीवी वॅस्पही अळ्यांचे नियंत्रण करतात. शेवटी अॅनाफेस फ्लॅव्हिपेस वॅस्पस अंडी खातात आणि चांगले नियंत्रक एजंट आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गॅमासिहॅलोथ्रिन हा सक्रिय घटक असलेली कीटनाशके ह्या उपद्रवावर सगळ्यात जास्त परिणामकारक आहेत कारण ही अंडी आणि अळ्या दोघांनाही प्रभावित करतात. जेव्हा प्रौढ अंडी घालत असतात किंवा ५०% अंडी ऊबलेली असतात तेव्हाच फवारे मारावेत. गैरवापराने ओ. मेलानोपसची संख्या वाढते कारण शिकारीही मारले जातात. ऑरगॅनोफॉस्फेटस (मॅलॅथियॉन) आणि पायरेथ्रॉइडस कुटुंबातील इतर कीटनाशकेही ओ. मेलानोपस विरुद्ध वापरली गेली आहेत.

कशामुळे झाले

औलेमा मेलानोपस नावाच्या बीटलच्या अळ्यांमुळे नुकसान होते. प्रौढ सुमारे ५ मि.मी. लांब असुन डोके आणि पाय लाल असतात आणि पंख गडद निळे असतात. ते शेताच्या बाहेरच्या कडांना पसरतात आणि कुंपण, रोपांचे अवशेष आणि झाडाच्या सालीच्या फटीसारख्या सुरक्षित जागी विश्रांती घेतात. वसंतात जेव्हा तापमान सुमारे १० डिग्री सेल्शियस असते तेव्हा हे परत येतात. ऊबदार वसंत ऋतु ह्यांच्या जीवनचक्राला अनुकूल आहे, तर थंड हवामान बाधा करते. संभोगानंतर माद्या चकचकीत पिवळी दंडगोलाकार अंडी पानांच्या खालच्या बाजुला, मध्य शिरेच्या बाजुने घालतात आणि फार काळासाठी (४५-६० दिवस) घालतच रहातात. ७-१५ दिवसांनी अळ्या बाहेर येतात आणि पानाच्या वरच्या बाजुची त्वचा खायला लागतात, ज्यामुळे फार नुकसान होते. त्या पांढर्‍या किंवा पिवळ्या, पाठीवर उंटासारखी मदार असलेल्या, काळे डोके आणि सहा छोटे पाय असलेल्या असतात. २-३ अठवडे खाल्यानंतर जेव्हा त्या वयात येतात तेव्हा कोषात जातात आणि प्रौढ बीटल्स सुमारे २०-२५ दिवसांनी बाहेर येतात आणि जीवनचक्र पुन्हा चालू होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण लावा.
  • भागात किंवा देशातील क्वारंटाइन नियम तपासा.
  • वसंताच्या सुरवातीला जेव्हा तापमान चढु लागते तेव्हा शेताचे नियमित निरीक्षण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा