इतर

पूर्वीय लष्करी अळी

Mythimna separata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कोवळ्या रोपांना पानांना व कणसांवर खाल्ल्याचे नुकसान दिसते.
  • पाने करवतीच्या पात्यासारखी दिसु लागतात.
  • प्रदुर्भावाच्या ठिकाणी ओल्या तपकिरी विष्ठेच्या ओळी दिसतात.
  • अकाली पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके

इतर

लक्षणे

सुरवंट कोवळ्या रोपांना किंवा पानांना खातात व कालांतराने कोवळ्या कणसांवर देखील हल्ला करु शकतात. ते बहुधा पानाचे टोक आणि कडा खातात ज्यामुळे पाने करवतीच्या पात्यासारखी दिसु लागतात. प्रदुर्भावाच्या ठिकाणी ओल्या तपकिरी विष्ठेच्या ओळी दिसतात. उच्च संख्या असल्यास पानगळही होऊ शकते. कणसाला थेट नुकसान फार कमी होते कारण किडे रोपाच्या वरच्या भागात तेव्हाच जातात जेव्हा खालची सर्व पाने बहुधा खाऊन झालेली असतात. सर्व पाने खाऊन झाल्यावर मोठ्या संख्येने ते इतर शेतात स्थलांतरीत होतात म्हणुन हे सामान्य नाव. सुरवंट कोवळी रोपे किंवा पाने खातात व कालांतराने कोवळ्या कणसांवरही हल्ला करु शकतात. गवतासारख्या पर्यायी यजमानांमुळेही त्यांच्या पसरण्यास प्रोत्साहन मिळते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ब्रॅकोनिड वॅस्प अॅपानटेलिस रुफिक्रुस आणि ताचिनिड माशा एक्सॉरिस्टा सिव्हिलिस हे अळ्यांना खातात आणि परिणामकारकरीत्या किड्यांची संख्या कमी करतात आणि म्हणुन प्रदुर्भावाच्या घटना देखील कमी होतात. प्रौढाना मारण्यासाठी स्पिनोसॅडच्या विषारी सापळ्यांचा वापर केला जाऊ शकतो. ब्युव्हेरिया बासियाना आणि इसारिया फ्युमोसोरोसी बुरशीही नियंत्रणाचे इतर उपाय आहेत. ते वसाहत करुन अळ्यांना मारतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर प्रादुर्भाव खूप गंभीर असेल तरच कीटनाशकांचा वापर केला गेला पाहिजे. सायपेरमेथ्रिनची फवारणी अळ्यांच्या नियंत्रणासाठी शक्यतो संध्याकाळी केली गेली पाहिजे. बियाणे उगवल्यानंतर २५-३० दिवसांनी काही कीटनाशकांचा वापर केल्यासही लष्करी अळ्यांच्या संख्येचे नियंत्रण करण्यासाठी चांगला परिणाम मिळु शकतो. क्लोरपायरीफॉस असणारे विषारी सापळे देखील वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

प्रौढ पतंग फिकट ते लालसर तपकिरी असुन त्यांच्या पंखांचा पल्ला ४-५ सें.मी लांब असतो आणि छातीवर केस असतात. पुढचे पंख राखाडीसर पिवळे असुन त्यावर काळे ठिपके असतात. शरीराच्या मध्य भागावर अस्पष्ट किनारीचे दोन स्पष्ट स्वच्छ डाग असतात. पाठचे पंख निळसर राखाडी असुन त्यावर गडद शिरा आणि बाहेरील कडा गडद असतात. प्रौढ निशाचर असतात आणि प्रकाशाकडे खूप लवकर आकर्षित होतात. माद्या फिकट दुधाळ अंडी पानांच्या खालच्या बाजुला घालतात. जेव्हा तापमान १५ डिग्री सेल्शियसच्यावर असते तेव्हा ते चांगल्या प्रकारे जगतात आणि जास्त अंडी घालतात. सुरवंट गुबगुबीत असुन फिकट हिरव्या ते तपकिरी रंगाचे असतात. त्यांच्या शरीरावर लांबट पट्टे असतात जे बगलेत काळ्या डागात विस्तारीत होतात. ते निशाचर असुन चांगले खतपाणी दिलेल्या शेतात त्यांची भरभराटही चांगली होते. उद्रेक होण्याकरिता अनुकूल परिस्थितीमध्ये दीर्घ मुदतीच्या कोरड्या हवामानानंतर जोरदार पाऊस अनुकूल असतो.


प्रतिबंधक उपाय

  • किड्यांची उच्च संख्या टाळण्यासाठी पेरणीची वेळ संयोजित करा.
  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी पिकाचे निरीक्षण करा.
  • रोपातील अळ्यांना हाताने वेचून काढा.
  • प्रकाश किंवा कामगंध सापळे वापरुन प्रादुर्भावाला आळा घालण्याचा प्रयत्न करा.
  • शेतातील आणि आजुबाजुच्या तणांचे नियंत्रण करा.
  • संक्रमित भागाभोवती खंदक (नाल्या) खणा ज्यामुळे अळ्यांच्या फिरण्यास आळा बसेल.
  • गादी वाफ्यांमध्ये पाणी भरा ज्याने अळ्या बुडुन मरतील.
  • शेतातील झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा