बटाटा

बटाटा पिकावरील भुंगा

Leptinotarsa decemlineata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • प्रौढ आणि अळ्या बटाट्याची पाने खातात.
  • ह्यांची लोकसंख्या खूप जास्त झाल्यास झाडांची पूर्ण पानगळ होऊ शकते.
  • अळ्या लालसर असून पाकोळी प्रमाणेच त्यांच्याही बगलेत काळ्या ठिपक्यांच्या दोन रांगा असतात.
  • पाकोळीच्या पांढरट तपकिरी पाठीमागच्या पंखावर दहा काळे पट्टे असतात.

मध्ये देखील मिळू शकते


बटाटा

लक्षणे

कोलोरॅडो पाकोळीचे प्रौढ आणि अळ्या पानांच्या कडा खातात आणि अखेरीस झाडांची पानगळ होऊ शकते. त्यांची काळी विष्ठा काही वेळा दिसु शकते. उघडे पडलेले बटाट्याचे कंद देखील काही वेळा खाल्ले जातात. प्रौढ पिवळसर नारंगी आणि अंडाकृती आकाराचे असतात. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पांढर्‍या तपकिरी पाठीवर दहा काळे पट्टे असतात. डोक्यावर त्रिकोणी काळा चट्टा असून छातीवर अनियमित गडद चिन्हे असतात. अळ्यांचे वैशिष्ट्य आहे कि त्या पाकोळीसारख्याच दिसतात आणि त्यांची त्वचा लालसर असून पाकोळी प्रमाणेच त्यांच्याही बगलेत काळ्या ठिपक्यांच्या दोन रांगा असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

स्पिनोसॅडवर आधारीत जीवाणूजन्य कीटकनाशकांचा वापर करा. बॅसिलस थुरिंजिएनसिस जीवाणूसुद्धा अळीच्या काही टप्प्यांमध्ये परिणामकारक आहे. पेरिलस बायोक्युलाटस ढेकुण आणि प्रिस्टियोनचस य़ुनिफॉर्मिस सुत्रकृमी सुद्धा पाकोळीला खातात. एडोव्हम पुट्लेरी सारख्या परजीवी वॅस्प आणि मायिओफॅरस डोरिफोरे सारख्या परजीवी माशा सुद्धा कोलेरॅडो पाकोळीचे नियंत्रण करण्यात मदत करु शकतात. अनेक पर्यायी जैविक उपचार शक्य आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बटाट्यावरील बीटल्ससाठी कीटनाशके सामान्यपणे वापरली जातात पण किड्यांच्या जीवनक्रमामुळे ते कीटनाशकांना झटकन प्रतिकार निर्माण करतात. कोणते उपाय वापरुन ह्यांची लोकसंख्या नियंत्रित केली जाऊ शकते ते तपासा.

कशामुळे झाले

बटाट्यावरील पाकोळीचे प्रौढ जमिनीत खोलवर जिथे सुर्यप्रकाश पोचणार नाही तिथे सुप्तावस्थेत रहातात. ते वसंत ऋतुमध्ये कोषातुन बाहेर येऊन कोवळ्या रोपांना खायला सुरवात करतात. माद्या नारिंगी, लांबुळकी अंडाकृती आकाराची अंडी २० ते ६० च्या पुंजक्याने पानांच्या खालच्या बाजुला घालतात. उबल्यानंतर अळ्या बाहेर येऊन सतत पाने खातात. त्यांच्या विकासाच्या शेवटी, त्या पानांवरुन खाली पडतात व माती खणून आत गोलाकार रचना तयार करून पिवळसर कोषात जातात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • अळ्यांची उच्च लोकसंख्या वेळ टाळण्यासाठी लवकर लागवड करा.
  • पाकोळीचे निरीक्षण करण्यासाठी किंवा मोठ्या संख्येने पकडण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावा.
  • ४५% उतार असलेले खंदक (नाली) करा किंवा प्लास्टिक / जैव आच्छादन जमिनीवर पसरा.
  • निरीक्षण करुन पाकोळीला वेचुन काढा किंवा झाडे हलवुन त्यांना खाली पाडा.
  • पाकोळीला पूरक असलेली पिके शेजारी लाऊन बटाटा पिकावरील नुकसान कमी करता येऊ शकते.
  • लेडीबग्ज, लेसविंग आणि स्पाइन्ड सोल्जर सारख्या मित्रकिडींची लोकसंख्या वाढवा.
  • पर्यायी नसणार्‍या यजमानांबरोबर पीक फेरपालट करा.
  • पीक घेतल्यानंतर नांगरुन झाडांचे अवशेष शेतातुन काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा