आंबा

आंब्यावरील फळमाशी

Ceratitis cosyra

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • सालीवर तपकिरी डाग.
  • फळ रंगहीन होते.
  • रस गळतो आणि चिकटपणा येतो.
  • बाहेर पडण्याची छिद्रे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

संसर्गाची लक्षणे फक्त फळांवरच दिसतात. माद्या त्यांची अंडी पिकलेल्या आंब्यातच घालतात. संक्रमित फळे अळ्यांद्वारे आतुन खाल्ली गेल्यामुळे आणि विष्ठेमुळे मधासारख्या चिकट गराची होतात. फळांच्या पृष्ठभागावर अळ्या जिथुन बाहेर पडतात ती छिद्रे स्पष्ट दिसतात. आतील गर सडल्याने सालीवर तपकिरी आणि काही वेऴा काळे डाग दिसतात. साल काही वेळा खडबडीत दबल्यासारखी दिसते. फळे रंगहीन दिसु शकतात आणि जसजसे फळाचे सडणे वाढते तसतसे बुरशीचे डाग दिसु लागतात. नंतर त्यातुन घाणेरडा वास येऊ लागतो आणि काही वेळा त्यातुन बुरशी आणि मधासारख्या चिकट रसाचे मिश्रण झिरपते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ज्या सापळ्यात प्रोटिन आमिष लावलेले आहे ते सापळे सी कोसिराच्या संख्येचे नियंत्रण करण्यासाठी आणि पकडण्यासाठी उपयुक्त असतात. मेटार्हिपझियम अॅनिसोप्लाइ बुरशी फळमाशीच्या कोषांवर जगतात आणि ह्या बुरशीचा वापर हाताने पसरल्याने किंवा तेलावर आधारीत फवारणीने करता येऊ शकते. फळे 46 डिग्रीपेक्षा जास्त गरम असलेल्या पाण्यात बुडविल्यास किंवा जास्त काळ ७.५ डिग्री तापमानात ठेवल्यानेही अळ्या मरतात.

रासायनिक नियंत्रण

सापळ्यात कीटनाशक (उदा. मॅलेथियॉन किंवा डेल्टामेथ्रिन) च्याबरोबर खास अमिष (प्रोटिन हायड्रोलिसेट किंवा प्रोटिन ऑटोलिसेट) लावण्याची शिफारस केली जाते. झाडाच्या आजुबाजुच्या सर्व माशांना आकर्षित केले जात असल्याने ह्या पद्धतीच्या वापराने माशांचे व्यवस्थित नियंत्रण करता येते. सी. कोसिराच्या नरांना आकर्षित करुन अडकविण्यासाठी टर्पिनियॉल असिटेट किंवा मिथाइल युजेनॉल वापरता येईल.

कशामुळे झाले

सेराटिटिस कॉसिरा नावाच्या फळमाशीच्या अळ्यांमुळे ही लक्षणे उद्भवतात. प्रौढांचे शरीर पिवळसर असते आणि त्यांच्या छातीवर विखुरलेले काळे ठिपके असतात. त्यांचे पंख पिवळे असून ४-६ मि.मी. लांबीचे असु शकतात. माद्या पिकत असलेल्या आंब्यात अंडी घालतात आणि दोन अठवड्यांपर्यंत घालतच रहातात. २-३ दिवसांनी अळ्या बाहेर येतात आणि आंब्याच्या गराला खाताना बोगदे करायला सुरवात करतात. एका फळात ५० पर्यंत अळ्या असु शकतात आणि काही वेळा प्रादुर्भावाची लक्षणे फळाची काढणी झाल्यानंतरच दिसतात. कोषावस्थेत जाण्यासाठी अळ्या जमिनीवर पडतात आणि मातीच्या वरचे थर पोखरून आत शिरतात. साधारणपणे ९-१२ दिवसात पूर्ण वाढलेल्या माशा त्या कोषातून बाहेर येतात.


प्रतिबंधक उपाय

  • लवकर परिपक्व होणार्‍या जाती लावा म्हणजे फळमाशांची संख्या कमी असतानाच फळे काढणीसाठी येतील.
  • संक्रमित किंवा गळलेली फळे दररोज वेचा.
  • संभाव्य माशीच्या आक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रोटीन सापळे स्थापित करा.
  • पर्यायी यजमान जसे कि लिंबुवर्गीय पिके, पेरु, पपई, कलिंगडासारखी पिकांची आजुबाजुला लागवड करणे टाळा.
  • पालापाचोळ्याखाली असलेली फळे शोधून काढण्यासाठी झाडाच्या आजुबाजुचे तण काढताना किंवा मशागत करताना काळजीपूर्वक लक्ष देऊन वेचुन बाहेर काढा.
  • आंब्याच्या जाती लावताना शक्यतो सगळ्यांची वाढ एकसारखी होईल याची काळजी घ्या.
  • फक्त निरोगी आंब्यांचेच परिवहन आणि विक्री करा.
  • जे आंबे विकले गेले नाहीत ते लगेच वापरले जातील किंवा नष्ट केले जातील हे पहा.
  • झाडांभोवती मशागत केल्यास जमिनीतील वाढणारे कोष नष्ट होतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा