इतर

एरमाइन पतंग

Yponomeutidae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवंट अधाशीपणे पाने खातात ज्यामुळे फांदीच्या टोकाशी पानगळ होते.
  • ते पुष्कळशी पाने एकत्र विणुन निवारा किंवा "तंबु" तयार करतात.
  • गंभीर संक्रमणात फळांची वाढ थांबते आणि अकाली गळतात.
  • सुरवंट आणि काळी विष्ठा असलेले राखाडी कोष सापडतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
सफरचंद
चेरी
पेयर

इतर

लक्षणे

सफरचंदावरील एरमाइन पतंग मुख्यत्वेकरुन पडित बागा आणि अंगणातील झाडांवर हल्ला करतात पण ते व्यापारी बागातील उपद्रवही होऊ शकतात. ते पानांना अधाशीपणे खातात ज्यामुळे फांदीच्या टोकावर पानगळ होते. ते पानांना एकत्र विणुन निवाराही तयार करतात. जर त्यांनी तयार केलेले निवारे किंवा "तंबु" संख्येने खूप जास्त असतील तर पूर्ण झाडाची पानगळ होऊ शकते. अशा वेळी फळांची वाढ थांबते आणि अकाली गळतात. तरीपण, उपद्रव क्वचितच रोपाच्या स्वास्थ्याला किंवा जोमाला जास्त काळ प्रभावित करतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बहुतेक वेळा उपचारांची गरज भासत नाही कारण झाडांना होणारे नुकसान हे वरवरचे असते आणि सहन केले जाऊ शकते. टाचिनिड माशा, पक्षी आणि कोळ्यांसारखे सर्वसामान्य शिकारी सफरचंदावरील एकमाइन पतंगांचे नियंत्रण करण्यात मदत करतात. अॅजेहियास्पिस फ्युसिकोलिस जातीचे परजीवी वॅस्पसचा वापर लोकसंख्या कमी करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार कमी करण्यासाठी सफलतापूर्वक केला गेला आहे. बॅसिलस थुरिंगिएनसिस जंतुंवर आधारीत जैव कीटनाशकांनीही सुरवंटांची संख्या नियंत्रित करण्यात यश मिळविले आहे. संपर्क कीटनाशक पायरेथ्रिनचा वापरही केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. झाडावर पूर्णपणे कीटनाशकांचा वापर करुन खूप जास्त संख्येचे नियंत्रण केले जाऊ शकते. संपर्क किटनाशके डेल्टामेथ्रिन किंवा लँब्डा-सायहॅलोथ्रिन अळ्यांच्या नियंत्रणात मदत करु शकते. आंतरप्रवाही कीटनाशके असेटामिप्रिडचा वापरही केला जाऊ शकतो. ज्या रोपांवर फुलधारणा झाली आहे त्यावर फवारे मारु नयेत कारण परागीकरण करणार्‍या कीटकांना धोका असतो.

कशामुळे झाले

यपोनोम्युटॉइडिया कुटुंबातील अळ्यांनी खाल्ल्यामुळे लक्षणे उद्भवतात. पतंग उन्हाळ्याच्या मध्यावर ऊगवतात. त्यांचे शरीर लांब आणि अरुंद असुन रंगाने पांढरे असते आणि पंखांचा पल्ला १६-२० मि.मी. असतो. पांढरे आणि झालरवाल्या पुढच्या पंखांवर छोटे काळे ठिपके विखुरलेले असतात तर पाठचे पंख राखाडीसर असतात ज्यांच्या कडाही झालरवाल्या असतात. माद्या कळ्यांजवळ किंवा काटकीच्या बेचक्यांजवळ पिवळसर अंडी पुंजक्यांनी सालींवर एकावर एक घरटे केल्यासारखी घालतात. कळ्या उमलण्याच्या सुमारास अळ्या बाहेर येतात आणि पानांत खोदायला सुरवात करतात. त्या हिरवट पिवळ्या, सुमारे २० मि.मी. लांब आणि काळ्या ठिपक्यांच्या दोन रेषा त्यांच्या शरीरावर असतात. ते त्यांच्या पाने विणुन केलेल्या सामुदायीक "तंबु"च्या आतुन अधाशासारख्या खातात. अळ्यांच्या टप्प्याचे पुष्कळसे टप्पे पार केल्यानंतर सुरवंट फिरकीच्या आकाराच्या रेषमी कोषात जातात जे गुच्छाने पानाला लटकलेले असतात. ह्यांची प्रतिवर्षी फक्त एकच पिढी होते.


प्रतिबंधक उपाय

  • बागेचे नियंत्रण करा आणि संक्रमित कोंब किंवा फांदी काढा किंवा छाटा.
  • कीटनाशकांचा वापर नियंत्रित ठेऊन टाचिनीड माशा, पक्षी आणि कोळ्यांसारख्या शिकार्‍यांच्या लोकसंख्येला उत्तेजन द्या.
  • लोकसंख्येचे निरीक्षण करण्यासाठी आणि पतंगांना पकडण्यासाठी कामगंध सापळे वापरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा