केळी

पानांवरील लाल कोळी

Raoiella indica

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या खालच्या बाजुला किंवा पानांवर कोळ्यांच्या लाल वस्त्या दिसतात.
  • कोळ्य‍ांनी टाकलेली बरीचशी पांढरी कात देखील दिसते.
  • पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि पिवळे किंवा करपट भाग देखील विकासित होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजुला बहुधा मोठ्या संख्येने (१००-३००) लाल कोळी आढळतात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिली जाऊ शकतात. त्यांच्या जीवनाचे सर्व टप्पे मुख्यत: लाल असतात, तर माद्यांच्या शरीरावर गडद भाग (भिंगाच्या सहाय्याने) दिसतात. विकसित होणार्‍या प्रौढांनी टाकलेल्या पांढर्‍या कात देखील या जिवंत कोळींबरोबर दिसतात. त्यांची पानांवरील किंवा पर्णगुच्छावरील उपस्थितीमुळे सुरवातीला त्याच भागातील कडा पिवळ्या होतात, ज्या नंतर पसरत शीरांना समांतर जात मोठ्या पिवळ्या भागात बदलतात. कालांतराने करपट डाग निर्माण होऊन पिवळसर भागांची जागा घेतात. ताडाच्या झाडाखालील पर्णगुच्छ बहुधा गंभीररीत्या प्रभावित होतात. केळीवरील गंभीर संक्रमणाने कोवळे रोपांची मर होऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

अॅम्ब्लिसेयस लारगोएनसिस नावाची भक्षक कोळी जर बागात सोडले तर लाल कोळीची संख्या कमी होण्यात मदत मिळते. इतर भक्षक किडे आणि लेडी बीटल्स देखील लाल कोळीना खातात. म्हणुनच हे महत्वाचे आहे कि या भक्षक किडींची नैसर्गिक संख्या सर्वसामान्य कीटकनाशके वापरुन प्रभावित करु नये.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. स्पिरोमेसिफेन, डायकोफॉल आणि एसक्विनोसिलची द्रावणे प्युअरटो रिको प्रजातीच्या नारळावरील लाल कोळींची संख्या कमी करण्यात परिणामकारक ठरली आहेत. इटोक्झॅनोल, अॅबामेक्टिन, पायरिडाबेन, मिल्बेमेक्टिन आणि गंधक असणार्‍या उत्पादांची फवारणी करुन कोळींचे नियंत्रण फ्लॉरीडामध्ये केले गेले आहे. याबरोबरच केळीवरील चाचणीत अॅसेक्विनोसिल आणि स्पिरोमेसिफेन सारख्या कोळीनाशकांच्या वापराने देखील लाल कोळ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.

कशामुळे झाले

राओएला इंडिका नावाच्या ताडावरील लाल कोळीमुळे नुकसान होते. ते "खोटे जाळी बनविणारा कोळी" या नावाने देखील ओळखल्या जाणार्‍या गटाचे आहेत, त्यांचे शरीर चपटे असते आणि विशेष म्हणजे ते इतर कोळ्‍यांप्रमाणे जाळी विणत नाहीत. ते झाडातील पेशींत आपली सोंड खुपसुन पेशीतील द्रव्य शोषतात. या कोळींचे वहन सहजपणे वाऱ्याच्या झुळकीने किंवा संक्रमित रोपाच्या वहनाने, रोपवाटिकेतील रोपांतुन आणि रोपाच्या कापलेल्या फांद्यांतुन होते. पाऊस आणि उच्च सापेक्ष आर्दता यांच्या लोकसंख्येवर नकारात्मक प्रभाव टाकते तर उष्ण, उन्हाचा आणि कोरडा काळ यांना प्रोत्साहन देतात. केळी व्यतिरिक्त ताडावरील लाल कोळी बरेचशा फळ येणार्‍या ताडाच्या जातींनाही जसे कि, नारळ, खजुर आणि अरेका पाम्स आणि शोभेच्या पाम्सनाही उपद्रव करतात. काही शोभेचे पाम्स यांच्या यजमानांची यादी पूर्ण करतात.


प्रतिबंधक उपाय

  • संक्रमित लागवड सामग्रीचे वहन टाळा.
  • मित्र किड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कीटकनाशकांचा वापर सिमीत ठेवा.
  • उपद्रवाच्या लक्षणांकरता बागांचे नियमित निरीक्षण करा.
  • हत्यारे आणि कामगार ह्यांत उच्च दर्जाची स्वच्छता राखा.
  • बागातील आणि आजुबाजुचे पर्यायी यजमानांना काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा