ऑलिव्ह

ऑलिव्हच्या कळ्यांतील कोळी

Oxycenus maxwelli

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • पाने विळ्याच्या आकाराची आणि वसंत ऋतुत झाडीतील फुटवे मृत होतात.
  • फुलांच्या कळ्या रंगहीन होतात, फुल गळ होते, फुले फुलत नाहीत आणि कोंबांची वाढ कमी असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

ऑलिव्हवरील कोळी रसाळ फांद्या, कळ्या आणि पानांच्या वरच्या पृष्ठभागात रस शोषण करतात ज्यामुळे वाढीचे नुकसान होते. कोळ्यांच्या हल्ल्याच्या लक्षणात येतात, पानांवर ठिपके असणे, पाने रंगहीन होणे आणि मध्यातुन मुडपणे ज्यामुळे ती विळ्यासारखे दिसतात. प्रदुर्भावाच्या इतर चिन्हात येते, वसंत ऋतुत झाडीचे फुटवे मृत असणे, फुलांच्या कळ्या रंगहीन असणे, फुल गळ होणे आणि फुले विकसित न होणे आणि कोंबांची वाढ कमी होणे. कोवळ्या पानांचे देठ विकृत होतात ज्यामुळे दुरुन पाहिल्यास "झाडू" सारखे दिसते. ह्या किडी मोठी समस्या नाहीत कारण ऑलिव्हचे झाड ह्या प्रादुर्भावास झेलु शकते आणि त्यातुन स्वत:च सावरुही शकते. तरीही फारच कोवळ्या ऑलिव्ह झाडावरील गंभीर प्रादुर्भावणे झाडाची वाढ गंभीररीत्या खुंटू शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

लेडी बीटल्स आणि काही प्रकारचे भक्षक कोळी ओ. मॅक्सवेलीला खातात आणि त्यांना बागेत सोडले जाऊ शकते. विस्तृत श्रेणीची कीटकनाशके वापरुन त्यांना मारु नका. बागायतीची उन्हाळी तेले वापरली जाऊ शकतात जी नैसर्गिक भक्षकांना भिजविल्या जाणार्‍या गंधकांवर आधारीत उत्पादनांपेक्षा कमी त्रास देतात कारण त्यांचा अवेशेषात्मक काळ अत्यंत छोटा असतो. तेलांना, चांगले पाणी दिलेल्या ऑलिव्ह झाडांवर, जेव्हा तापमान थंड असते तेव्हा वापरले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लोकसंख्या जर मोठ्या संख्येने आढळुन आली तर कळ्या उमलण्यापूर्वीच ऑलिव्हच्या झाडांवर उपचार करावेत. पाण्यात विरघळणारे गंधक प्रभावी ठरलेय पण जर तापमान ३२ अंशावर गेले तर झाडाचे नुकसान होऊ शकते म्हणुन पाण्यात विरघळणारे गंधक वापरण्याऐवजी गंधक भुकटीची डस्टिंग करणे सुरक्षित असते. गंधकाची फवारणी करणे हा अजुन एक पर्याय आहे.

कशामुळे झाले

ऑक्झिसेनस मॅक्सवेली नावाच्या ऑलिव्हच्या कळ्यांवरील कोळीमुळे लक्षणे उद्भवतात. हे सूक्ष्म (०.१-०.२ मि.मी.) जंतु असुन उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हे रंगाने पिवळसर ते गडद गव्हाळी असतात, हालचाल हळु असते आणि शरीराचा आकार पाचरीसारखा, चपटा असतो जो त्या कुटुंबातील बहुतेक प्रजातींसाठी विशेष असतो. ते फक्त ऑलिव्ह बागेतच रस शोषण करत असल्याने त्यांचे जीवनचक्रही ऑलिव्ह झाडाच्या चक्राशी निगडित आहे. वसंत ऋतुत प्रजोत्पादनासाठी ते नव्या पाने आणि कळ्यांवर जातात आणि मादी सुमारे ५० अंडी तिथे घालते. अंड्यातुन बाहेर येणार्‍या अळ्या आणि पिल्ले पुष्कळशा फुलांना खातात आणि देठ मोडतात ज्यामुळे ते अकालीच गळतात. नंतर कोळी कोवळ्या फळांवर हल्ला करतात ज्यामुळे फ़ळांना खाल्लेल्या जागेच्या सभोवताली रंगहीनता आणि आकसणे होते.


प्रतिबंधक उपाय

  • ऑलिव्ह कळ्यांतील कोळ्यांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करत चला.
  • ऑलिव्ह कळ्यांतील कोळ्यांच्या भक्षकांवर परिणाम होऊ नये म्हणुन कीटकनाशकांचा उपयोग नियंत्रित राखावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा