ऊस

उसाचा गवताळवाढ रोग

Sugarcane grassy shoot phytoplasma

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • अरुंद आणि फिकट पाने.
  • संक्रमित झाड गवतासारखे दिसते.
  • फुटव्यांची वाढ खुंटलेली असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

जेव्हा पीक ३-४ महिन्याचे होते तेव्हाच पहिली लक्षणे दिसतात. कोवळी पाने रंगाने फिकट, पातळ आणि अरुंद होतात. जसा रोग वाढतो, तसे नविन फुटवे पांढरे किंवा पिवळे होतात ज्यामुळे झाड गवतासारखे दिसु लागते. प्रभावित खुंटांची वाढ खुजी असते आणि पानांच्या खालील नविन फुटवे अकालीच वाढतात. पूर्ण वाढ झालेल्या ऊसावरील दुय्यम संसर्गात बाजुने फुटवे येतात आणि पिवळे पडतात. बहुधा संक्रमित बेण्यापासुन ऊगवलेले रोगट रोप विक्रीयोग्य रहात नाहीत आणि अनेक कांडे काढणीनंतर उगवत नाहीत ज्यामुळे लागवड केल्यानंतर खोडव्या मध्ये बरीच तूट पडते. जर ऊस लागलेच तर ते पातळ असतात, पेरे छोटे असतात आणि खालच्या पेरांना जमिनीपासुन उंचावर मुळे फुटतात. अशा ऊसांच्या कळ्याही बहुधा पातळ असतात आणि अनैसर्गिकपणे लांबट असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोगाचे थेट उपचार शक्य नाहीत. पण मावा हे ऊसावरील गवती फुटव्यांचे मुख्य वाहक असल्याने त्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. सौम्य लागण झाली असता, साधे कीटकनाशक साबणाचे द्रावण किंवा झाडाच्या तेलांवर आधारीत द्रावण वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोगाचा थेट सामना करण्यासाठी कोणतेही रसायनिक नियंत्रण नाही पण मावा आणि तुडतुड्यांची संख्या जर खूपच फोफावली असेल तर कीटकनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. डायमिथोएट (१ मि.ली. प्रति ली. पाणी) किंवा मिथिलडेमेटन (२ मि.ली. प्रति ली. पाणी) (मावासाठी) ची फवारणी महिन्याच्या अंतराने दोनदा केली जाऊ शकते.

कशामुळे झाले

फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूसारख्या जीवांमुळे रोग उद्भवतो. फायटोप्लाझ्माचे प्राथमिक वहन संक्रमित कांड्यांद्वारे होते. दुय्यम वहन साखर वहन करणार्‍यास भागाला खाणार्‍या किड्यांमुळे खास करुन पानांवरील तुडतुडे आणि मावा तसेच मूळ खाणारे डॉड्डर परजीवींमुळे होते. ह्याचे वहन कापणीचे साहित्य जसे कि विळा-कोयत्यांद्वारेही होते. ज्वारी आणि मका हे या रोगाचे पर्यायी यजमान आहेत. ह्याची लक्षणे बरीचशी लोह कमतरतेसारखीच असतात पण शेतात यादृच्छिक, वेगळ्या भागात दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी बेणा वापरा आणि प्रतिकारक वाण जसे कि सीओ ८६२४९, सीओजी ९३०७६ आणि सीओसी २२ लावा.
  • आपल्या बेण्यातून जंतुंचा नायनाट करण्यासाठी संक्रमित बेण्याला ५० अंश गरम पाण्यात २ तास बुडवा किंवा ५४ अंशाच्या आर्द्र गरम हवेचे उपचार २ १/२ तासासाठी करा.
  • बेण्याला लेडेरमायसिन (प्रतिजैविक) ५०० पीपीएम द्रावणाचे उपचार लागवडीपूर्वी करा.
  • रोगाच्या आणि/किंवा किड्यांच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • जर लागवडीनंतर २ अठवड्यात संक्रमित रोप आढळली तर त्यांना काढुन निरोगी रोप लावा.
  • प्रभावित झाड काढुन लगेच जाळुन नष्ट करा.
  • पिवळे चिकट सापळे माव्यांसारख्या वाहकांचे नियंत्रण करण्यासाठी वापरा.
  • पीक फेरपालटाने शेतातील जंतु कमी होऊ शकतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा