उडीद आणि मूग

घेवड्याच्या पानावरील जिवाणूजन्य करपा

Xanthomonas axonopodis pv. phaseoli

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर छोटे पाणी शोषल्यासारखे पिवळसर कडा असलेले ठिपके येतात.
  • कालांतराने त्यांच रुपांतर कोरड्या, तपकिरी आणि पिवळसर रंगांच्या व्रणात होते.
  • पानगळ होते.
  • वाढ खुंटते खोडावर लालसर आणि पिवळ्या रेषा तयार होतात आणि त्यातुन पिवळसर पू आलेला दिसतो.

मध्ये देखील मिळू शकते


उडीद आणि मूग

लक्षणे

वाढीच्या कोणत्याही काळात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. झाडाच्या वयाप्रमाणे लक्षणात थोडाफार फरक पडु शकतो. रोपाच्या शेंड्यांना इजा होणे आणि कोणात्मक पाणी शोषल्यासारखे ठिपके मुख्य पानांवर आणि खोडावर येणे ही लक्षणे फक्त संक्रमित बियाण्यांच्या वापरामुळे रोपांवर येतात. दिवसा झाडावर एक वैशिष्ट्यपूर्ण मरगळ दिसते. जर वाढीच्या नंतरच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास पानांवर लहान, पाणी शोषल्यासारखे व पिवळीधमक कडा असलेले ठिपके तयार होतात. कालांतराने हे तपकिरी करपट ठिपक्यात बदलतात ज्यामुळे झाड करपल्यासारखे दिसते ज्यामुळे पानगळ देखील होऊ शकते. रोगग्रस्त झाडे खुजी राहुन खूप कमी शेंगा लागतात व त्यावर लालसर तपकिरी किंवा विटकरी रंगाचे ठिपके असतात. खोडावर लालसर रेषा येतात व त्या फुटुन त्यातुन पिवळसर पू बाहेर येतो. शेंगा वाढीच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास, दाणे आक्रसलेले, सुरकुतलेले, सडलेले किंवा रंगहीन दिसु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

झांथोमोनस अॅक्झोनोपोडिस पीव्ही. फासौली विरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत माफ करा. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आम्हाला पान कळवा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच उपलब्ध असली तर जैविक उपचार पध्दतीचा विचार करा. रोगाचा रासायनिक उपचार बऱ्याचदा व्यवहार्य नाहीत कारण त्यांच्या प्रदीर्घ वापराने हे जिवाणू त्या रसायनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतात. बियाणांना ५०० पीपीएम स्ट्रेप्टोमायसिन द्रावणात ३० मिनीटांसाठी पेरणीपूर्वी भिजत ठेवावे. जर जिवाणूनाशकांची गरज पडलीच तर ज्या उत्पादात कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि मान्यताप्राप्त अँटिबायोटिक (स्ट्रेप्टोमायसिन किंवा प्लँटोमायसिन २ ग्रॅ/ली) आहे ते फवारणीतुन वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

हे झांथोमोनास अॅक्झोनोपोडिस पीव्ही. फासौली जिवाणू जमिनीत, बियाणांच्या टरफलात, पर्यायी यजमानात आणि पाला पाचोळ्यात फार काळापर्यंत सुप्तावस्थेत राहु शकतात. पावसाळा, ओले आणि गरमट हवामान (२५-३५ डिग्री सेल्शियस) आणि उच्च आर्द्रता ह्यांच्या लागणीसाठी अनुकूल आहे. वार्‍याच्या पावसाने, पावसाच्या झोडपण्याने आणि किड्यांमुळे (टोळ आणि चवळी वरील भुंगे) रोग चांगलाच पसरतो. रोपावरील नैसर्गिक छिद्रे आणि जखमा ह्या रोगाच्या लागणीला अनुकूल असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित, रोगमुक्त बियाणे वापरा.
  • प्रतिरोधक किंवा सहनशील वाणांची निवड करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी नियमितपणे पिकांचे किंवा रोपांचे निरीक्षण करत चला.
  • आपल्या परिसरात योग्य लावणी वेळेची खात्री करा.
  • फवारा पद्धतीने सिंचन देणे टाळा.
  • शेतीशी निगडीत हत्यारे आणि अवजारे स्वच्छ ठेवा.
  • रोगग्रस्त झाडे काढुन जाळुन टाका.
  • मक्यासारख्या यजमान नसलेल्या पिकांबरोबर, त्या काळासाठी पीक फेरपालट करण्याची शिफारस केली जाते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा