बटाटा

जिवाणूजन्य मर

Ralstonia solanacearum

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पूर्ण झाड मरगळते.
  • पाने हिरवीच आणि फांदीला चिटकुनच रहातात.
  • मूळ आणि खोडाच्या बुडाचा भाग तपकिरीसर होतो.
  • मुळ कुजु शकतात आणि पिवळसर द्रव सोडतात.

मध्ये देखील मिळू शकते

9 पिके

बटाटा

लक्षणे

कोवळी पाने दिवसाच्या उच्च तापमानाच्या काळी मरगळतात आणि हवामान थंड पडल्यावर थोडी सावरतात. अनुकूल काळात पूर्ण झाडावरच मरगळ पसरते आणि कायमची रहाते. मरगळलेली पाने फांदीलचाच चिकटुन रहातात आणि हिरवीगारही असतात. मुळे आणि खोडाच्या बुडाचा भाग मात्र गडद तपकिरी रंगाची मलीनता दाखवितो. संक्रमित मुळे दुय्यम जिवाणूच्या लागणीमुळे कुजु शकतात. जर मुळे कापली तर पांढरट ते पिवळसर दुधाळ पू बाहेर येतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

क्रुसिफेरस जातीच्या झाडाचा ताजा पालापाचोळा जमिनीत (जैवधूमन) घातल्यास या जिवाणूचे नियंत्रण करण्यात मदत मिळते. झाडाचे अवशेष जमिनीत घालण्यासाठी भिजवुन नरम केले जाऊ शकते किंवा बारीक चिरुन मग जमिनीत मशिनद्वारे किंवा हाताने गाडले जाऊ शकते. झाडापासुन बनलेले रसायन थायमॉल देखील तोच परिणाम देते. सोलानेसियस झाडाच्या मुळात घर करणारे प्रतिस्पर्धी जिवाणू देखील परिणामकारक ठरतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जिवाणू जमिनीत रहात असल्याने रोगावर रसायनिक उपचार करणे अव्यवहार्य, कमी परिणामकारक किंवा परिणाम नसलेले आहे.

कशामुळे झाले

जिवाणू खूप काळापर्यंत जमिनीत जिवंत रहातो. तो झाडांच्या अवशेषात किंवा पर्यायी यजमानात जिवंत राहू शकतो. आडवे मूळ पसरताना झालेल्या जखमांतुन तो आत प्रवेश करतो. वाढलेले तापमान (३० ते ३५ अंश सेल्शियस), उच्च आर्द्रता आणि जमिनीतील ओलावा आणि अल्क सामू असलेली जमिन हे रोगाच्या वाढीसाठी अनुकूल आहेत. जड माती जी ओलावा फार काळ राखते ती खासकरुन संवेदनशील असते. टोमॅटो आणि केळी हे राल्स्टोनिया सोलानेसिएरम बुरशीच्या मुख्य पर्यायी यजमानात येतात.


प्रतिबंधक उपाय

  • लवचिक वाण निवडा.
  • जमिन, सिंचनाचे पाणी, बियाणे आणि रोप जिवाणू विरहीत असण्याची खात्री करा.
  • लागवड करताना शिफारशित अंतर ठेवा.
  • शेतात पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या.
  • पीक फेरपालट ५ वर्षे किंवा अधिक काळासाठी करा.
  • जमिन थोडी आम्लाची आणि सामू ६.० ते ६.५ चा असण्याची काळजी घ्या.
  • चांगले पोषण पुरवा.
  • रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी बाधीत झाडांना काढुन टाका.
  • बाधीत जमिनीत वापरलेली अवजारे निरोगी जमिनीत वापरु नका.
  • हत्यारांना दुसर्‍या शेतात काम करण्याआधी ब्लीचने निर्जंतुक करा.
  • संक्रमित झाड आणि त्यांचे अवशेष जाळुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा