ऊस

ऊसाच्या कोंबाची वाढ खुंटविणारा रोग

Leifsonia xyli

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • कोंबाची वाढ खुंटते.
  • खोड बारीक रहाते, पेरे छोटी असतात, पाने फिकट पिवळसर असतात.
  • खोडांत आतील रंगहीनता किंवा लाल नेक्रोसिस दिसुन येते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

पात्यांचे कोंब असणार्‍या पीकात बहुधा आढळतो. पहिल्यांदा वाढ खुंटण्याव्यतिरिक्त दृष्य निदान करता येण्यासारखी लक्षणे दिसत नाहीत. पेराच्या भागात आतील मऊ भागात जंतुंचे नारिंगी रंगांचे ठिपके, टाचणीच्या टोकासारखे दिसतात. नंतर रोगाचे वैशिष्ट्य असलेली रोपाची वाढ खुंटणे, खोडे बारीक रहाणे आणि पेरे छोटी होणे, पाने पिवळरसर होणे आणि खोड वरच्या भागात झपाट्याने अरुंद होत जाणे ही लक्षणे दिसतात. हवामानाप्रमाणे आणि जातीप्रमाणे पेरे पिवळी ते लालसर तपकिरी होऊ शकतात. रंगहीनता सांध्यांच्या मध्ये पोचत नाही. काही उच्च संवेदनशील जाती आद्रतेच्या ताणाखाली मरगळु शकतात आणि पानांच्या टोकावर आणि कडेला नेक्रोसिसही पहावयास मिळतो. पीकाचे उत्पादन कमी होणे हे ही अजुन एक लक्षण आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

ऊसाचे बियाणे उपचारांपूर्वी १-५ दिवस कापून आणि (५० डिग्री सेल्शियस) गरम पाण्यात १० मिनीटे उपचारपूर्व ठेवावे. दुसर्‍या दिवशी ५० डिग्री सेल्शियस तापमानाच्या गरम पाण्याचे उपचार २-३ तास करावेत. हे लक्षात घ्या कि रुजण्याचा दर चांगलाच कमी होतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अमोनियम सल्फेटच्या वापराने रोग भरपूर कमी झाला आणि ऊसाचे उत्पादन वाढुन पांढर्‍या साखरेचे उत्पादनही वाढले. स्ट्रेप्टोमायसिनबरोबर ५२ सेंटिग्रेड गरम पाण्याचे ३० मिनीटांसाठी केलेल्या उपचारांनीही रोग थोडा दडपला गेला आणि उत्पादन वाढले.

कशामुळे झाले

जंतु जमिनीत किंवा रोपांच्या अवशेषात पुष्कळ महिन्यांपर्यंत जगु शकतो आणि रोपात फक्त जखमांतुन आत शिरतो. अवजारांद्वारे जखमांतुन जंतु सहजरीत्या शिरकाव करु शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी ऊस लावुन रोगास पसरु देऊ नका.
  • रोपांना काळजीपूर्वक हाताळा जेणेकरुन जखमा होणार नाहीत.
  • पीक घेतल्यानंतर रोपांचे अवशेष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा