इतर

पोंग्यावरील गाठ

Agrobacterium

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • खोडाच्या खालच्या बाजुला फुगीर उंचवटे दिसतात.
  • सुरवातीला लहान, गळु धरल्यासारखी वाढ होते.
  • उन्हाळ्याच्या सुरवातीला जेव्हा तापमान २० डिग्री सेल्शियस किंवा त्यापेक्षा जास्त असते अशा वेळी दिसतात.
  • ही गळवे झपाट्याने वाढतात आणि फिकट रंगाच्या, जवळपास गोलाकार फुगीर उंचवट्याना जन्म देतात जे चांगलेच मोठे होऊ शकतात.
  • जस जसे ते मोठे होतात तस तसे ते सुकतात आणि करपतात व त्यामुळे त्यांचा रंगही गडद होतो.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
बदाम
द्राक्षे
ऑलिव्ह
पीच

इतर

लक्षणे

खोडाच्या खालच्या बाजुला फुगीर उंचवटे येणे ह्या रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. खोड आणि बुडाच्या भागाव्यतिरिक्त हे उंचवटे कलम केलेल्या ठिकाणी किंवा मूळांवरही दिसु शकतात. सुरवातीला छोटी गळवे उन्हाळ्याच्या सुरवातीला जेव्हा तापमान २० डिग्री सेल्शियस किंवा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा दिसतात. ही गळवे झपाट्याने वाढतात आणि फिकट रंगाची,जवळपास गोलाकार फुगीर उंचवट्याना जन्म देतात जे चांगलेच मोठे होऊ शकतात. जस जसे ते मोठे होतात तस तसे ते सुकतात आणि करपतात व त्यामुळे त्यांचा रंगही गडद होतो. एकदा का हे उंचवटे वाढु लागले कि मग ते बाधीत वेलींच्या खोडांना आणि फांद्याना पूर्णपणे वेढतात आणि मग अन्न व पाणी वर पोचण्यात अडथळा निर्माण करतात. ह्यामुळे वेलीची वाढ खुंटते व फांद्या आणी वेली सुकु लागतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

विरोधी प्रतिजैविक जिवाणू अॅग्रोबॅक्टेरियम रेडियोबॅक्टर प्रकार के -84 चा वापर प्रभावी पध्दतीने अनेक पिकांमध्ये क्राऊन गॉल्स नियंत्रित करण्यासाठी केला गेला आहे. दुर्दैवाने ही पद्धत द्राक्षांवर काम करत नाही. पर्यायी पद्धतीत बॅक्टेरियम ए चा प्रकार एफ२/५ वापरल्याने चांगले परिणाम दिसुन आले आहेत पण ते उत्पाद अजुनतरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेले नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्राऊन गॉल्स विरुद्ध (बॅक्टिरीनाशक,प्रतिजैविके) सध्या उपलब्ध असलेले रसायनिक उपचार फक्त लक्षणांचे उपचार करतात आणि जिवाणूच्या संसर्गाला नियंत्रण करीत नसल्याने जास्त परिणामकारक नाहीत. ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी वेलींना जखमा होऊ न देणे आणि लागवडीचे ठिकाण योग्य निवडणे खूप महत्वाचे आहे.

कशामुळे झाले

द्राक्ष व पिच सारख्या आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पिकांना ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. अॅग्रोबॅक्टिरियम व्हिटिस नावाच्या जीवाणू मुळे हा रोग होतो, जे खूप वर्षांपर्यंत झाडाच्या अवशेषामध्ये जमिनीत जिवंत राहू शकतात. मग ह्यातुनच नविन झाडांना लागण होते. कोणतीही जखम ह्या जीवाणुना प्रवेश करण्यास पुरेशी असते आणि परिणामी गळवांची रचना होते. ह्या जखमा हवामान परिस्थितीमुळे (जसे कि गोठणे, गारपीट), बागेत काम करताना मुळांना किंवा वेलींना झालेली इजामुळे (छाटणी, कलम करणे, रसशोषक किडी /तण काढताना) होतात. हे जिवाणू वेलीच्या खोडात कोणतेही लक्षण न दर्शविता खूप वर्षे वाढत राहू शकतात म्हणुन वरवर निरोगी दिसणार्‍या झाडांची किंवा वेलींची छाटणी केलेले भाग एका बागेतून दुसर्‍या बागेत नेण्यानेही ह्यांचे संक्रमण होऊ शकते. रोगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लागवडीस योग्य ठिकाण निवडणे अतिशय महत्वाचे आहे. उदा. जिथे तापमान थंडीत गोठण्याइतके होऊ शकते, तिथे क्राऊन गॉल्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडून उपलब्ध झालेले निरोगी कलम वापरावे.
  • कमी तापमानात गोठण्यामुळे होणाऱ्या समस्यांना प्रतिरोधक असलेल्या जाती निवडा.
  • ज्या भागात तपमान गोठण्या इतपत खाली जात असते अशा भागात हा रोग टाळण्यासाठी लागवडीचे योग्य ठिकाण निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.
  • लागवडीसाठी क्षेत्र निवडताना ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेले नाही असे ठिकाण निवडावे.
  • बागेमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे कॅनोपी व्यवस्थापन केले गेले पाहिजे.
  • बागेत पाण्याचा निचरा व्यवस्थित राहु द्या.
  • बागेत काम करते वेळी वेलींना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी.रोगाचे संशय असलेले वेलींचे भाग एका बागेतून दुसऱ्या बागेत नेऊ नये.

प्लँटिक्स डाऊनलोड करा