सोयाबीन

पानांवरील जिवाणूजन्य ठिपके (झँतोमोनाज)

Xanthomonas axonopodis pv. glycines

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या दोन्ही बाजुंना केंद्रात उंचवटलेले फिकट हिरवे ठिपके येतात.
  • ठिपक्याच्या केंद्रात फोड विकसित होतात.
  • अनियमित तपकिरी करपट डाग तयार होतात.
  • डाग गळुन पडु शकतात आणि त्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

कोवळ्या पानांच्या एका किंवा दोन्ही बाजुंवर सूक्ष्म, फिकट हिरवे ठिपके उमटतात. या ठिपक्यांचे केंद्र उंचवटलेले असते आणि नंतर ती केंद्रे फिकट तपकिरी किंवा नारिंगी रंगाच्या फोडात बदलतात जे पानाच्या शिरांना लागुन असतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, हे ठिपके एकमेकांत मिसळुन बहुधा पिवळी प्रभावळ असलेला मोठा तपकिरी अनियमित डाग तयार करतात. यातील वाळलेले भाग वार्‍याने गळुन पडतात ज्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात. बारीक उंचवटलेले भाग शेंगांवर देखील विकसित होऊ शकतात. रोगामुळे अकाली पानगळ होते आणि दाण्यांचा आकार तसेच संख्याही कमी भरते.

Recommendations

जैविक नियंत्रण

झँन्थोमोनाज अॅक्झोनोपोडिसविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. चांगला परिणाम मिळण्यासाठी रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचा (उदा. कॉपर ऑक्झिक्लोराइड, ३ ग्रॅ./१ ली. पाणी) वापर करावा.

कशामुळे झाले

झँथोमोनाज अॅक्सोनोपोडिस पीव्ही ग्लायसिन्स जिवाणूंमुळे लक्षणे उद्भवतातजे पीकांच्या अवशेषात किंवा जमिनीतील बियाण्यात विश्रांती घेतात. त्यांचे वहन वारा, पाण्याचे थेंब आणि किडींद्वारे केले जाते आणि त्या झाडाच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा शेतकाम करताना झालेल्या जखमातुन आत प्रवेश करतात. रोग बहुधा मोसमात लवकर होतो पण नंतर झालेले संक्रमणही शक्य आहे. ऊबदार आणि ओलसर हवामान परिस्थितीबरोबर वारंवार पडणारे पावसाचे शिडकावे आणि पानांचे ओले रहाणे हे रोगाच्या विकासाला अनुकूल आहे. रोगाच्या वाढीसाठी उत्कृष्ट तापमान ३०-३३ अंश सेल्शियस असते. पलाश आणि स्फुरद या जीवाणूच्या नियंत्रणात महत्वाची भूमिका निभावतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण लावा.
  • फक्त जिवाणूमुक्त बियाणेच वापरा.
  • यजमान नसणार्‍या पिकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • शेतात मशागत करताना खास करुन पाने ओली असताना झाडांना इजा होऊ देऊ नका.
  • खतयोजनेत पलाश आणि स्फुरद असण्याची काळजी घ्या.
  • शेतात स्वच्छता राखा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरा किंवा झाडांचे सर्व अवशेष काढुन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा