कोबी

जिवाणूजन्य काळी कुज

Xanthomonas campestris pv. campestris

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पिवळे पाचरीच्या आकाराचे धब्बे पानांच्या कडांवर येतात.
  • धब्बे मोठे होऊन तपकिरी होतात.
  • पानांच्या शिरा काळ्या पडतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
फुलकोबी

कोबी

लक्षणे

बहुतेक वेळा, कोबीचे नुकसान बहुधा उन्हाळ्यात उशीरा दिसते. मुख्य लक्षण आहे पानांच्या कडांवर पिवळे पाचरीच्या आकाराचे डाग येतात, जे नंतर पानाच्या मध्याकडे पसरतात आणि खाली खोडावरही उतरतात. ह्या लक्षणामुळे काळ्या कुजेला फ्युसॅरियम विल्टपासुन वेगळे काढता येते जिथे लक्षणे जमिनीपासुन खालुन वर खोडाकडे सरकतात. जसजसा रोग वाढत जातो, पानांवरील पिवळा भाग वाढत जातो आणि जशा पेशी मरतात तसे डाग तपकिरी होतात. रोगाच्या अखेरच्या टप्प्यावर पानांच्या शिरा काळ्या पडतात म्हणुन रोगाला हे नाव दिले गेले. अखेरीस पाने कोलमडतात. जंतु खोडातुन शिरुन शिरांमधुन सर्वत्र पसरतो, ज्यामुळे जमिनीजवळचा भाग कापला असता त्यात काळ्या रंगाचे वर्तुळ दिसते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बियाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ५० डिग्री सेल्शियसच्या पाण्यात ३० मिनीटांसाठी बियांणांना ठेवण्याची शिफारस करण्यात येते. ह्याचा परिणाम काळ्या कुजीसाठी १००% प्रभावी नसतो पण रोगाची घटना खूप कमी होते. पण ह्यामुळे रुजण्याचा दरही कमी होऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शेत दुषित होऊ नये म्हणुन गरम पाण्याने बीजप्रक्रिया केल्यास परिणाम चांगला होतो. कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांची पानांवरील फवारणी दर सात ते दहा दिवसांनी केल्यासही रोगाचा प्रसार हळु होतो. दुर्दैवाने ह्या उपचारांमुळे काळी कुज कोबीच्या पानावर बाहेरच्या बाजुला विकसित होते.

कशामुळे झाले

जमिनीत रहाणार्‍या झँथोमोनोज कँपेस्टिस नावाच्या जंतुमुळे ही लक्षणे उद्भवतात जो संक्रमित पीकाच्या अवशेषात किंवा बियांत सुमारे २ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो किंवा ब्रासिका कुटुंबाच्या तणात फार काळापर्यंत राहू शकतो. कोबी कुटुंबातील पुष्कळ जातींच्या भाज्यांना (ब्रॉकोली, फुलकोबी, सलगम, मुळा, कोल्हाबी वगैरे) लागण करतो. निरोगी झाडांवर जंतु पाण्याच्या थेंबांबरोबर पसरतो आणि वेगवेगळ्या मार्गांनी आणि जखमांतुन पेशीत शिरतो. एकदा का रोपावर संक्रमण झाले मग रोग इतर कोबींवरही झटकन पसरतो. जर जमिन किंवा बिया दूषित असतील तर पहिले लक्षण रोपवाटिकेतच दिसते. उच्च आद्रता आणि २५ ते ३० डिग्री सेल्शियसचे तापमान जंतु आणि संक्रमणाच्या प्रक्रियेसाठी उत्कृष्ट आहे. फार जवळ जवळ लावलेली रोपांमुळे जंतु एका रोपावरु दुसर्‍या रोपावर पसरण्यात मदत होते. अशा परिस्थितीत, पीकाचे उत्पादन जवळपास ७५-९०%नी कमी होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडील निरोगी बियाणे घ्या.
  • प्रतिकारक वाण लावा आणि पावसाळ्यात संवेदनशील जाती लावु नका.
  • मोठ्या आकाराचे आहेत म्हणुन कलमाची छाटणी करु नका.
  • शेतातुन पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या आणि रोपे उंचावलेल्या बांधावर लावा.
  • ज्या शेतात ब्रॉकोली, फुलकोबी, केल कोबी किंवा ब्रासिका कुटुंबातील पीके गेल्या तीन वर्षात घेतली असतील त्या शेतात कोबी लावु नका.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण, खास करुन ब्रासिका कुटुंबाचे तण काढुन टाका.
  • तुषार सिंचन टाळा आणि दुपारच्या वेळेस सिंचन करा.
  • रोगाचा प्रसार होऊ नये म्हणुन रोपे ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • रोगट जमिनीला स्पर्श करणारी जुनी पाने छाटा.
  • हत्यारे स्वच्छ ठेवा आणि ब्लीच वापरुन निर्जंतुक करा.
  • पीक घेतल्यानंतर रोपांचे अवशेष काढुन खोल पुरा किंवा जाळा.
  • रोपाला इजा करु शकणार्‍या कोबी किड्यांचे आणि इतर किड्यांचे नियंत्रण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा