लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीयांवरील पिवळा मोझाईक विषाणू

CiYMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळी नक्षी दिसते.
  • फळांचे पृष्ठभाग तसेच रंगही अनैसर्गिक असतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

नव्या पानांवर छोट्या पिवळ्या ठिपक्यांनी लक्षणांची सुरवात होते, जे नंतर मोठे होऊन शिरांच्या बाजूने ठळक पिवळी रचना विकसित करतात. पक्व पानांचा पृष्ठभागही खरबडीत असु शकतो आणि कोवळी पाने लहानच रहातात. फळांवर पिवळे धब्बे आणि उंचावलेले हिरवे भाग दिसतात. झाडाची वाढ आणि फळ उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या समस्यासाठी जैविक नियंत्रण शक्य नाही.

रासायनिक नियंत्रण

ह्या वाहकांच्या नियंत्रणासाठी रसायनिक नियंत्रण पुरेसे नाही. कलमे नेहमीच विषाणू मुक्त असण्याची खात्री करा.

कशामुळे झाले

लिंबूवर्गीयावरील पिवळा मोझाईक विषाणू पहिल्यांदा भारतात सापडला आणि आता भारतातील आंध्र प्रदेशात जिथे लिंबूवर्गीय पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, तिथे सहज सापडतो. ह्या किडीचा प्रसार दूषित कलमांद्वारे होतो आणि पुष्कळशा व्यावसायिक रोपवाटिकांनीही ह्या रोगाची प्रकरणे अहवालीत केली आहेत. विषाणूचा प्रसार लिंबूवर्गीयावरील मिलीबगद्वारे आणि दूषित अवजारांच्या वापरानेही होतो. हा विषाणू एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर आकाशवेलींद्वारे जातो, ज्या सामान्य तण आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीसाठी विषाणू मुक्त, प्रमाणीत कलमेच वापरा.
  • लिंबूवर्गावरील मिलीबगला (प्लॅनोकोक्कस सिट्री) विषाणू वाहक म्हणुन ओळखण्यात आले आहे, म्हणुन ह्या किडीच्या नियंत्रणानेही मदत मिळते.
  • शेतातुन तण खासकरुन आकाशवेल काढुन टाका.
  • विविध झाडांवर वापरण्यापूर्वी आपली अवजारे नेहमीच स्वच्छ करा.
  • किडीत प्रतिकार निर्माण करणे अद्यापतरी उपलब्ध नाही आणि लवकर ओळखण्यासाठीही संवेदनशील निदान साधन विकसित करण्याचीही गरज आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा