भुईमूग

भुईमूगावरील पंख्यासारखे पिवळे ठिपके देणारा विषाणू

GCFSV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • वर्तुळाकार ठिपके, कळ्या सुकणे, रुपेरी विखुरलेले ठिपके आणि शिरांवरील पट्टे.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

पानांवर आणि फळांवर लक्षणे उद्भवतात व काही वेळा फांद्याही वाळलेल्या दिसतात. प्रमुख लक्षणात येतात, वर्तुळाकार ठिपके (ह्यात पिवळे, वाळलेले, आणि विभागलेले ठिपकेही सम्मिलित आहेत), कळ्या सुकणे, रुपेरी विखुरलेले ठिपके आणि शिरांवरील पट्टे. रोगाच्या अवस्थेप्रमाणे लक्षणे बदलतात पण पिवळे आणि वाळलेले वर्तुळाकार ठिपके सर्व टप्प्यांवर (सुरवातीला, मध्यावर आणि उशीरा) येतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

यजमान नसलेल्या पिकांसह उचित पीक फेरपालट करा. भक्षक कोळी, मिरिड आणि इतर नैसर्गिक भक्षकांना शेतात सोडुन वाहकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण केले जाऊ शकते. वाहक किड्यांना, जसे कि फुलकिडे, आकर्षित करुन पकडण्यासाठी पिवळे किंवा निळे चिकट सापळे लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शेतात फुलकिड्यांचे (वाहकांचे) नियंत्रण करण्यात पानांवरील कीटनाशकांचा वापर निष्प्रभ ठरतो कारण हे कीटनाशकास प्रतिकार निर्माण करु शकतात.

कशामुळे झाले

जीसीएफएसव्ही प्रजातीच्या ऑर्थोटोस्पोव्हायरसेसमुळे नुकसान उद्भवते ज्याचे वहन फुलकिडे करतात. विषाणूंचा प्रसार विषाणूंनी संक्रमित केलेल्या बियाणांद्वारे किंवा रोपांद्वारेही होतो. तणही दुय्यम संक्रमणास धार्जिणी परिस्थिती पुरवितात आणि शेतात विषाणूंचा उद्रेक होतो.


प्रतिबंधक उपाय

  • रोपे विषाणूजन्य संक्रमणास खूप धार्जिणी असतात म्हणुन रोपावस्थेत संक्रमण टाळा.
  • रोपे हरितगृहात, कीटप्रतिबंधक जाळी लाऊन किंवा कमाल अडथळ्यांची खबरदारी घेऊन, फुलकिड्यांचे प्रभावी नियंत्रण करुन, वाढवावित जेणेकरुन विषाणूजन्य नुकसानाचा प्रतिबंध होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा