सफरचंद

सफरचंदाच्या पानांवर पिवळसर डाग देणारा विषाणू (क्लोरोटिक लीफ स्पॉटस)

ACLSV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पाने विकृत येतात.
  • पानांवर डाग असतात.
  • अकाली पानगळ.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
सफरचंद
जर्दाळू
चेरी
पीच
अधिक

सफरचंद

लक्षणे

विषाणूंच्या प्रजाती आणि यजमान वाण किंवा संक्रमित केलेल्या वाणाप्रमाणे रोग विविध प्रकारची लक्षणे दर्शवितो. तरीही बहुतेक वाणात विषाणू विश्रांती घेत असतो ह्याचाच अर्थ असा कि संक्रमित झाडात दृष्य लक्षणे दिसत नाहीत. पानांवर पिवळसर ठिपके आणि रेषांचे पॅटर्न दिसणे आणि अकालीच पानगळ होणे ही वैशिष्ट्ये आहेत. झाडांची वाढ खुंटलेली असते आणि त्याच्या खोडाच्या आतील भाग तसेच रोगट कळ्या रंगाने काळ्या असतात. ह्या विषाणूमुळे उपचार न करता येण्यासारख्या पद्धतीने झाड कोलमडते. ह्यामुळे सफरचंदाच्या पानांवर गडद हिरवे दबलेले डाग किंवा नागमोडी रेषा उमटतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत, आम्हाला ह्या रोगाविरुद्ध कोणतीही जैव नियंत्रण पद्धत माहिती नाही. जर घटना किंवा लक्षणांची गंभीरता कमी करण्याची यशस्वी पद्धतीची आपणांस माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगाविरुद्ध कोणतीही रसायनिक नियंत्रण पद्धत आम्हांस माहिती नाही. जर घटना किंवा लक्षणांची गंभीरता कमी करण्याची यशस्वी पद्धतीची आपणांस माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

कशामुळे झाले

ट्रिकोवायरस गटातील विषाणूमुळे रोग होतो आणि टणक बियाणे असणार्‍या तसेच पोम (गाभ्यात एकत्रित बियाणे असणारे)फळांवरील आर्थिकदृष्ट्या महत्वाचा विषाणू आहे. रोगाचे संक्रमण वनस्पती वाढ, कलम आणि खुरपणीतुनही होऊ शकते. सफरचंदाच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर ह्या विषाणूमुळे फारच विनाशकारी प्रभाव पडु शकतो. बहुतेक संक्रमित झाडात दृष्य लक्षणे दिसत नसल्याने अजाणतेपणी संक्रमित साहित्याचे वाटप केले जाऊ शकते. सफरचंदाच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर ह्या विषाणूमुळे फारच विनाशकारी प्रभाव ३०% पर्यंत पडु शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त प्रतिकारक आणि विषाणू मुक्त प्रमाणित सामग्री तसेच वाणांची लागवड करा.
  • नविन बागेत संक्रमण टाळण्याचा उत्कृष्ट उपाय म्हणजे विषाणूचा शिरकावच होऊ न देणे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा