बटाटा

बटाट्यावरील एस विषाणू रोग

PVS

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पाने विकृत आकाराची व लालसर होतात.
  • पानांवर बारीक ठिपके येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बटाटा

लक्षणे

विषाणूची लक्षणे फारच विविध असतात आणि यजमान, हवामान परिस्थिती याप्रमाणे बदलतात. बहुतेक वाणात विषाणूजन्य संक्रमण लक्षणे दर्शिवत नाही. काही वाणात मात्र वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यावर संक्रमण झाल्यास शिरा थोड्या दबलेल्या, खरबडीत पाने, जास्त खुली वाढ, सौम्य उंचवटलेले फोड, तांबटपण किंवा छोटे करपट (काळे) ठिपके पानांवर दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

माव्याचे भक्षक खूप आहेत आणि शेताच्या चांगल्या सवयी वागवुन त्यांचे जतन केले पाहिजे. साबण आणि पाण्याचे सौम्य द्रावण पानांवर फवारुन माव्याचा नायनाट केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जरी विषाणूंचे थेट उपचार रसायनांद्वारे केले जाऊ शकत नसले तरी वाहकांचे प्रमुखपणे माव्याचे नियंत्रण काही प्रमाणात केले जाऊ शकते. मावा आणि त्याचे संभव रसायनिक नियंत्रण यासाठी डेटाबेस तपासा. आमच्या उत्पाद पानावर माव्यासाठीचे कीटनाशक दावा करणार्‍या लेबलांना नमुद केलेले आहे.

कशामुळे झाले

बटाट्यावरील एस. विषाणू ज्याला कार्लाविषाणू असेही म्हणले जाते त्यामुळे नुकसान उद्भवते. याचा वहन मुख्यत: माव्याद्वारे अविरतपणे होते. या रोगाचा भौतिक प्रसार यंत्रसामग्रीद्वारे, उपकरणांद्वारे आणि शेतात चालताना झाडांना झालेल्या इजामुळे देखील होते. इतर वाहकांपेक्षा मावा हेच यांचा वहन चांगल्या प्रभावीपणे करतात. हंगामाच्या नंतरच्या काळात झाडे पीव्हीएसला प्रतिकारक होतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रमाणित प्रतिकारक वाणांचीच लागवड सामग्रीच वापरा.
  • रोपवाटिका वाहक किड्यांपासुन मुक्त ठेवा.
  • शेतात स्वच्छता राखा आणि यांत्रिक उपकरणांद्वारे प्रसाराचा प्रतिबंध करा.
  • संक्रमित झाड तसेच पर्यायी यजमान (तन) काढुन नष्ट करा.
  • संशयास्पद बटाटा सामग्रीचे इतर शेतात वहन करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा