काकडी

कलिंगडावरील मोझाईक (जिवाणुजन्य रोग )व्हायरस

WMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानावर ठिगळासारखे किंवा उंचवटलेले ठिपके येतात व काही वेळा पाने विकृत होतात.
  • खरबुजावर गडद हिरवे चट्टे येतात.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
कारले
काकडी
खरबूज
लाल भोपळा

काकडी

लक्षणे

पीक, संक्रमणाची वेळ आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे लक्षणे बदलतात. तसेच संक्रमण जर मिश्रित म्हणजे काकडीवरील मोझाईक व्हायरस आणि झुकिनीवरील पिवळा मोझाईक व्हायरस सारख्या इतर विषाणुंबरोबर संक्रमण झाले असेल तर लक्षणे दबु किंवा बदलु शकतात. एकुणच पानांवर ठिगळासारखे किंवा विखुरलेले उंचवटलेले ठिपके, मस्से येतात आणि विविध पातळीने पाने विकृत होतात. फळांवरील रंग समान नसतो हे आणखी एक लक्षण आहे. खरबुजावर गडद हिरवे डाग किंवा फळांच्या एरवी पिवळसर असलेल्या पृष्ठभागावर धब्बे येतात. वाटाण्याच्या पानावरील उंचवटलेले ठिपके कालांतराने करपट डागात रूपांतरित होतात. पानांना नुकसान झाल्याने, या विषाणूच्या संक्रमणाबरोबर वाढीचा दर आणि उत्पादन देखील कमी होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

खनिज तेलांची फवारणी विषाणुंच्या वहनात बाधा आणतात आणि परिणामकारक नियंत्रण होऊ शकते. माव्याचे भक्षक भरपूर आहेत आणि त्यांना शेतीच्या चांगल्या सवयींद्वारे जोपासले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जरी विषाणुंचे थेट उपचार कीटकनाशकाद्वारे होत नसले तरी वाहकांचे मुख्यत: माव्यांचे नियंत्रण काही पातळीपर्यंत केले जाऊ शकते. तरीपण काही परिस्थितीत माव्यांवरील कीटकनाशकाचे उपचार सीमित परिणाम देतात. मावा आणि त्यांच्या संभाव्य रसायनिक नियंत्रणासाठी डेटाबेस तपासा.

कशामुळे झाले

कलिंगडावरील मोझाईक विषाणुंमुळे ही विविध लक्षणे उद्भवतात. या विषाणूचे, वाहक (मुख्यत: मावा) किंवा व्यक्ति किंवा हत्यारे अशा विविध प्रकारांनी वहन होते पण हे बियाणेजन्य नसल्याने बियाणांद्वारे होत नाही. मावा त्यांना रस शोषताना उचलतात आणि संपर्कानंतर काही तासात अविरतपणे प्रसार करतात. मुख्य पर्यायी यजमान काकडीवर्गीयांव्यतिरिक्त वाटाणा आणि अल्फाल्फा आहेत. प्रसार अविरतपणे होत असल्यामुळे कीटकनाशके विषाणुंविरुद्ध चांगला परिणाम देत नाहीत पण त्यांचा वापर माव्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन केला जाऊ शकतो. शेतात जर विषाणू असतील तर मावा त्यांचा प्रसार नविन यजमानांवर जोपर्यंत कीटकनाशकांमुळे माव्यांचा नाश होत नाही तोपर्यंत सतत करत रहातात.


प्रतिबंधक उपाय

  • काही पिकांचे प्रतिकारक वाण बाजारात उपलब्ध आहेत.
  • या रोगाच्या लक्षणांकरीता तसेच माव्यांच्या उपस्थितीकरीता शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट केल्यास विषाणूंना टाळण्यात मदत होईल.
  • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
  • मित्र किड्यांना नुकसान होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर सीमित ठेवा.
  • माव्यांना संरक्षण देणार्‍या.
  • मुंग्यांच्या लोकसंख्येचे चिकट पट्ट्या लाऊन नियंत्रण करा.
  • जमिनीवर प्लास्टिक अच्छादन वापरून माव्यांना पळवुन लावुन रोगामुळे होणारे नुकसान कमी करा.
  • प्रत्येक ओळीत पडदे बांधल्यास मावा झाडांवर पोचण्यास प्रतिबंध होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा