ऊस

ऊसावरील ठिगळ व्हायरस

SCMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • कोवळ्या पानांच्या पात्यावर पद्धतशीर ठिगळ पॅटर्न दिसतो.
  • अरुंद क्लोरोटिक पट्टे शिरांना समांतर जातात.
  • जुन्या पानांवर नेक्रोसिस दिसतो.
  • जुन्या पानांचे भाग लाल रंगाचे दिसतात.
  • रोपाची वाढ खुंटते आणि खोडे वांझ असतात.

मध्ये देखील मिळू शकते


ऊस

लक्षणे

कोवळ्या रोपांवरच लक्षणे जास्त दिसुन येतात. बाधीत रोपांवर फिकट हिरवा ते पिवळा धब्ब्यांचा विशिष्ट ठिगळ पॅटर्न नेहमीच्या हिरव्या रंगावर छापल्यासारखा दिसतो. काही वेळा ठिगळाला शिरांना समांतर जाणार्‍या अरुंद क्लोरोटिक किंवा नेक्रोटिक पट्ट्यांमुळे उठाव येतो. काही वेळा पट्टेही कोवळ्या खोडात दिसुन येतात. नंतर पानांवर सर्वसामान्य क्लोरोसिस दिसतो आणि पट्टे मोठे आणि जास्त येतात. जशी रोपे प्रौढत्वास येतात तसे पानांच्या पात्यांवर काही भागात लालसर छटा किंवा नेक्रोसिस निर्माण होते. लागणीच्या वेळेप्रमाणे रोपांची वाढ गंभीररीत्या खुंटते किंवा पूर्णपणे वांझ होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या रोगजंतुंचे संभावित पर्यायी यजमान जसे कि तण यांचे शेतात आणि आजुबाजुला नियंत्रण करा. अॅफिडच्या लोकसंख्येचे निरीक्षण आणि नियंत्रण करा कारण ते निरोगी रोपाला ह्या व्हायरसने बाधीत करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅफिडसची लोकसंख्या कमी करण्यासाठी कीटनाशकांचा वापर करु नका कारण ह्याचा परिणाम होत नाही हे सिद्ध झाले आहे.

कशामुळे झाले

ह्या रोगजंतुंचे वहन अॅफिडसद्वारे खाण्यामुळे होते आणि निरोगी रोपांना काही दिवसातच लागण होऊ शकते. एका रोपापासुन दुसर्‍या रोपावर यांचे संक्रमण अवजारांद्वारेही शक्य आहे, रोगजंतु पानांना झालेल्या जखमांतुनही आत शिरु शकतात. कोयता किंवा इतर हत्यारांद्वारे ह्यांचे संक्रमण शक्य नाही कारण रोगजंतु रोपांच्या पेशींबाहेर जास्त काळ जिवंत राहू शकत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिरोधक वाण लावा.
  • प्रमाणित स्त्रोताकडील रोगमुक्त बियाणे लावा.
  • अॅफिडसना खाणारे मित्र किडे भरपूर असतील याची काळजी घ्या.
  • बाधीत रोपांच्या संख्येवर लक्ष ठेवा.
  • रोपांना नुकसान वा जखमा होऊ देऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा