लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील ट्रिस्टेझा विषाणू

CTV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • खोड आणि फांद्यांमध्ये खड्डे तयार होतात.
  • पाने पिवळी पडतात आणि झाडाचा एकंदरीत जोम कमी होतो.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

सीटिव्ही संक्रमणाची लक्षणे खूप बदलत असतात आणि यजमान, त्या विषाणूचा जोम, आणि हवामान परिस्थितीसारख्या विविध घटकांवर अवलंबुन असतात. तीन मुख्य लक्षणे आहेत: झाडाचा जोम जाणे ("ट्रीस्टेझा"), खोड आणि फांद्यांमध्ये खड्डे तयार होणे आणि पाने पिवळी पडणे. जोम जाण्यात पाने पिवळी पडणे आणि संक्रमित झाड सामान्यपणे वाळते. पहिले लक्षण दिसल्यानंतर हे सर्व होण्यास अवधी, काही वेळेस काही महिने ते वर्षे लागु शकतात. मरगळ झपाट्याने होते, त्यामुळे पहिले लक्षण दिसल्यानंतर काही दिवसातच झाड वाळू शकते. संवेदनशील झाडांच्या खोड आणि फांद्यांवर मोठ्या संख्येने खड्डे दिसतात. काही वाणात फळाच्या सालीवर तेलकट वर्तुळे किंवा तपकिरी डाग चिकट स्त्रावासकट येतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पस किंवा मिजमाशीवरील शेतातील परिक्षणे अजुन चालू आहेत, जे लिंबुवर्गीय बागांमधील माव्याचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण करु शकेल. बाजारात उपलब्ध असलेली द्रावणे ( नैसर्गिक पायरेथ्रम, फॅटी अॅसिडस), कीटकनाशक साबण किंवा बागायतीतील तेले (झाडाचे किंवा माशांचे तेल), वापरुन लोकसंख्येचे नियंत्रण करा. पाणी आणि थोडे साबणाचे थेंब हे द्रावण फवारून देखील माव्याना पळवुन लावले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रसायनिक पर्यायांनी विषाणूंचे थेट नियंत्रण केले जाऊ शकत नाही. माव्याच्या रसायनिक नियंत्रणासाठी डेटाबेस तपासा.

कशामुळे झाले

सिट्रस ट्रिस्टेझा विषाणूमुळे ही लक्षणे उद्भवतात, जो लिंबुवर्गीय बागातील खासकरुन जोमदार आणि हानीकारक विषाणू आहे. या रोगाचे वहन मुख्यत: अविरतपणे टॉक्झोप्टेरा नावाच्या लिंबुवर्गीयावरील काळ्या माव्यांद्वारे केले जाते. संक्रमित झाडाला ५-६० मिनीटे काळा मावा रस सोषत राहिला तर तो विषाणूला उचलतो, पण वहन करण्याची क्षमता मात्र २४ तासांनंतर नाहीशी होते. याच प्रजातीतील इतर किडे देखील प्रसारास हातभार लावतात (उदा. कपाशीवरील मावा, अॅफिस गॉसिपी). संक्रमित कलमांद्वारे कलम केल्याने देखील या विषाणूंचे वहन इतर बागांमध्ये होऊ शकते. लक्षणांची तीव्रता विषाणूच्या क्षमतेवर अवलंबुन असते. काही प्रकारात कोणतीही दृष्य लक्षणे दिसत नाहीत. इतर प्रकारात झाडाची गंभीर मरगळ आणि मर होते किंवा खोडात आणि फांद्यात खोल खड्डे दिसतात. विषाणूच्या संक्रमणासाठी आणि प्रजोत्पादनासाठी चांगले तापमान २०-२५ अंश सेल्शियस आहे.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाचे संक्रमण थांबविण्यासाठी आपल्या भागातील क्वारंटाईन नियम तपासा.
  • प्रमाणित स्त्रोतांकडुनच लागवड सामग्री वापरा.
  • प्रतिकारक वाण (काही संकरीत वाण या विषाणूला सहनशील आहेत) वापरा.
  • रोपवाटिका आणि हरितगृहे किड वाहकांपासुन मुक्त ठेवा.
  • संशयित लिंबुवर्गीय सामग्रीचे वहन दुसर्‍या बागात करु नका.
  • लिंबुवर्गीय बागांचे रोगाच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करा.
  • आपण लक्षणे आणि त्याचा प्रसार करणार्‍या किड्यांना ओळखता याची खात्री करा.
  • संक्रमित झाडांना काढुन नष्ट करा.
  • सहचरी झाडे लावुन माव्याला आपल्या झाडांपासुन दूर ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा