सोयाबीन

सोयाबीनवरील विषाणू

SMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर फिकट आणि गडद हिरवी ठिगळांची संरचना विकसित होते.
  • सुरकुतलेले पान खालच्या दिशेने गोळा होते.
  • पानगळ, रोपाची वाढ खुंटते आणि शेंगा संख्येने आणि आकाराने कमी येतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

रोपावर संक्रमण कोणत्याही काळात होऊ शकते. प्रतिकारक वाणात दृष्य लक्षणे दिसत नाहीत. संवेदनशील वाणांच्या रोपातील कोवळ्या, झपाट्याने वाढणार्यार पानांवर संक्रमाणच्या सुरवातीच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण फिकट आणि गडद हिरवी ठिगळांची संरचना विकसित होते. कालांतराने संपूर्ण पान दाट फोडांनी भरुन जाते, शिरांच्या बाजुने सुरकुतते आणि खालच्या बाजूने गोळा होते. पानगळ, रोपाची वाढ खुंटणे आणि शेंगाची संख्या आणि आकार कमी होणे होते. थंड हवामान दरम्यान लक्षणे सर्वात गंभीर असतात आणि ३२ अंश सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त तापमानात निदर्शनात देखील येत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

एसएमव्हीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणुंच्या रोगावर रसायनिक उपचार शक्य नाहीत. माव्याच्या संख्येचे नियंत्रण करण्यासाठी कीटनाशकांचा वापर केला जाऊ शकतो परिणामी विषाणुंचे वहन नियंत्रित होऊ शकते पण याचा जास्त परिणाम होत नाही.

कशामुळे झाले

या विषाणुचे वाटणा, स्नेप बीन्स आणि बर्‍याच प्रकारचे तण यासारखे भरपूर यजमान आहेत. या विषाणूचे वहन मावा, संक्रमित बियाण्यद्वारे होते आणि जवळपासच्या यजमानात ते जिवंत राहू शकतात. प्रारंभिक वाढीच्या टप्प्यात संक्रमण परिणामी उत्पादनात नुकसान होऊ शकते, बियाण्याच्या गुणवत्तेस प्रभावित करू शकते आणि बीज उगवण आणि मुळांवर गाठी तयार करणे कमी होऊ शकते. हंगामात उशीरा होणारे संक्रमण कमी गंभीर असते. चांगले खत दिलेल्या आणि उच्च उत्पन्न संभव असणार्‍या शेतात जर मोठ्या संख्येने मावा असले तर विषाणुंच्या प्रसारास अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • विषाणुविरहित प्रमाणित बियाणे वापरण्याची खात्री करा.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • जर शक्य झाले तर लवकर पेरणी करा.
  • सोयाबीनचा विषाणुच्या इतर यजमानांबरोबर पीक फेरपालट करु नका.
  • शेतातील आणि आजुबाजुच्या तणांचे नियंत्रण करा.
  • रोपाच्या वाढीच्या प्रारंभिक अवधी दरम्यान शेतात जास्त खते देणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा