बटाटा

बटाट्यावरील एक्स प्रकारचा विषाणू

PVX

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर फिकट हिरव्या ठिगळासारख्या संरचना दिसतात.
  • उंचवटलेले भाग बारीक तपकिरी ठिपक्यांनी भरतात.
  • इतर व्हायरसबरोबरच्या सहसंक्रमणामुळे लक्षणे अधिकच बिघडू शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बटाटा

लक्षणे

लागवड केलेले वाण, झाडाचे वय, व्हायरस कोणत्या प्रजातीचा आहे आणि हवामान कसे आहे ह्यावर लक्षणांची गंभीरता अवलंबुन असते. शिरांमधील भागात पिवळेपणासारख्या अस्पष्ट लक्षणापासुन तर गंभीर फिकट हिरव्या ठिगळासारख्या संरचनेसोबत सुरकुतलेली पाने, पानांचे करपलेले टोक, झाडाची वाढ खुंटणे आणि वाळणे इथपर्यंत लक्षणे असतात. काही वेळा उंचवटलेले भाग बारीक तपकिरी ठिपक्यांनी भरतात. इतर व्हायरसबरोबरच्या सहसंक्रमणामुळे लक्षणे अधिकच बिघडू शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

पीव्हीएक्सवर कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचावापर करा. विषाणूजन्य रोगांवर कोणतेही रसायनिक उपचार शक्य नाहीत.

कशामुळे झाले

हे विषाणु अत्यंत संक्रमक आहेत. हे मुख्यतः टोमॅटो, बटाटे आणि मिरची सारख्या सोलॅनेसियस कुटुंबातील पिकांवर तसेच विविध जातीच्या तणांवर देखील जास्त प्रादुर्भाव करतात. या रोगाचे वहन संक्रमित झाडांच्या थेट संपर्काने किंवा टोळांद्वारे, संक्रमित शेतीउपयोगी अवजारे किंवा चुकीच्या शेतीच्या सवयींमुळे होते. १६-२२ डिग्री सेल्शियस तापमानात लक्षणे जास्त विकसित होतात. सभोवतालचे तापमान जास्त असल्यास लक्षणे बहुधा नजरेस पडत नाहीत.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित विषाणुरहित बियाणे वापरा.
  • पीव्हीएक्सला प्रतिकारक असलेले वाणांची निवड करा.
  • टोमॅटो आणि बटाटे शेजारी शेजारी लावु नका.
  • पीकाचे निरीक्षण करुन संक्रमण असण्याची आशंका असलेल्या झाडांना काढुन टाका.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • जर एकापाठोपाठ एका संवेदनशील पीकांच्या शेतात काम करीत असाल तर कपडे बदला आणि साबणाने स्वच्छ धुवा.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे निर्जंतुक ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा