सफरचंद

सफरचंदवरील मोझाइक विषाणूजन्य रोग

APMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • ठळक पिवळे डाग किंवा पट्टे पानांवर येतात.
  • लक्षणे पहिल्यांदा एकाच फुटव्यावर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

8 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
चेरी
अधिक

सफरचंद

लक्षणे

सुरवातीला पानांवर ठळक पिवळे डाग किंवा पट्टे फक्त एकाच फुटव्यावरील मुख्य शीरांच्या बाजुने दिसतात. जसा रोगाचा प्रसार होतो, तशी ही लक्षणे सर्व फुटव्यांच्या पानांवरही दिसु लागतात. प्रभावित पाने अकाली गळतात. झाडाची वाढ खुंटते.

Recommendations

जैविक नियंत्रण

विषाणूंचे संक्रमण बरे केले जाऊ शकत नाही. प्रभावित झाडापासुन इतर झाडांवर प्रसार होऊ नये म्हणुन प्रभावित झाड काढुन टाकावे लागते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूंच्या संक्रमणवर कोणतेही रसायनिक उपचार नाहीत.

कशामुळे झाले

ह्या विषाणूचे नैसर्गिक वाहक नाहीत. संक्रमित फांद्यांद्वारे विषाणूचा प्रसार होतो जेव्हा त्यांचा वापर कलमात केला जातो. विषाणूंचा प्रसार मुळाद्वारेही होऊ शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • कलमासाठी संक्रमण मुक्त झाडाची फांदी वापरा.
  • संक्रमित झाडांची फांदी कलमासाठी वापरु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा