पानांवरील जाळीदार करपा आणि मर

DURIAN

पानांवरील जाळीदार करपा आणि मर

Rhizoctonia solani

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात आणि त्वरीत मोठे होतात.
  • पाने बहुधा एकमेकांना चिकटतात.
  • संक्रमित पाने पिवळी पडतात, वाळतात आणि अखेरीस गळतात.
  • कोवळ्या शेंड्यांची टोके आणि फांद्या वाळतात आणि मरतात.
  • पावसाळ्यात हा रोग अत्यंत झपाट्याने पसरतो.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

पानांवरील जाळीदार करपा आणि मर

DURIAN

लक्षणे

पानांवरील पाणेरी बारीक तपकिरी ठिपक्यांपासून रोगाची सुरवात होते. हे ठिपके नंतर मोठे होतात आणि बहुधा टोक किंवा कडेपासुन सुरु होऊन पूर्ण पान व्यापतात. पानांच्या पूर्ण पृष्ठभागावर फिकट पिवळे किंवा तपकिरी बुरशीचे धागे पसरलेले दिसतात. हे धागे चिकट असतात ज्यामुळे पाने गुच्छासारखी एकमेकांना चिकटतात. जसजसे संक्रमण वाढते तशी पाने पिवळी, नंतर तपकिरी होऊन वाळतात. कोवळ्या झाडांवर शेंड्यांची टोकच "भाजल्यासारखी" होऊन गळतात. मोठ्या झाडात, कोवळी पाने वाळल्याने फांद्यांची टोकच वाळतात, ज्यामुळे त्या झाडाचे पीक चांगले येत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पर्यावरण पूरक पर्यायात येतात मित्र बुरशीसारख्या (ट्रायकोडर्मा प्रजाती) किंवा मदतगार जीवाणूंना (बॅसिलस सबटिलिस) वापरणे. ह्या मित्र जंतुंना पानांवर पसरुन किंवा मातीत मिसळल्याने ते वाईट बुरशीशी जागा आणि खाण्यासाठी स्पर्धा करतात. हे मित्र जंतु नैसर्गिकरीत्याही वाईट बुरशीवर हल्ला करुन तिची वाढ थांबवितात. हे जैविक उपचार मोसमात लवकर आणि जमीन तसेच झाडांना निरोगी राखण्याच्या नियमित योजनेचा भाग केले जातात तेव्हाच चांगला परिणाम देतात.

रासायनिक नियंत्रण

सर्वसामान्य रसायनिक व्यवस्थापन हे पावसाळ्यापूर्वीच पानांचे संरक्षण करण्यावर किंवा संक्रमणाचे पहिले चिन्ह दिसताच उपचार करण्यावर लक्ष केंद्रीत करते. उपचार हे पानांवर आणि नविन फांद्यावर बुरशीविरुद्ध ढालीच काम करण्यासाठी केले जातात. कारण बुरशी, मातीत आणि पिकांच्या अवशेषात जगते, म्हणुन जिथुन संक्रमण सुरु होते त्या भागात उपचार करणे महत्वाचे ठरते. बुरशीत कालांतराने उपचारांचा प्रतिकार निर्माण होऊ नये म्हणुन पूर्ण वर्षभर विविध व्यवस्थापन पद्धतींचा वापर करणे फायद्याचे ठरते.

कशामुळे झाले

हा रोग जमिनीत आणि पिकांच्या जुन्या अवशेषात जगणार्‍या बुरशीमुळे होतो. ह्या बुरशीचा प्रसार पावसाच्या मातीवर पडुन वर उडणार्‍या थेंबांमुळे बुडातील पानांवर व कालांतराने नवीन पानांवर होतो. ऊबदार तापमान आणि खूप जास्त आर्द्रता असल्यास ही बुरशी फोफावते. ह्यामुळे पावसाळा ह्या बागेसाठी सर्वात जास्त धोकादायक असतो. हिचा प्रसार दाट झाडीतील संक्रमित पानांचा निरोगी पानांना स्पर्श झाल्याने देखील होतो. जमिनीतील नत्र पातळी जास्त असल्यासही झाडीची दाट वाढ होते. ह्या प्रकारच्या झाडीच्या मऊ वाढीत बुरशी सहज शिरु शकते, ज्यामुळे असे झाड संक्रमणास अत्यंत संवेदनशील होते. जर बागेची छाटणी योग्य होत नसेल किंवा पाण्याचा निचरा चांगला होत नसेल, तर झाडीत साचलेली दमट हवा बुरशीची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा जेणेकरून झाडी जास्त दाट होणार नाही.
  • शेतात पाणी साचू नये म्हणुन पाण्याचा निचरा चांगला होण्याची व्यवस्था करा.
  • झाडांना संतुलित खत द्या आणि नत्राचा अतिवापर टाळा.
  • झाडाच्या बुडाशी पालापाचोळा पसरा जेणेकरुन जमिनीतून उडणार्‍या पाण्याद्वारे बुरशी वर उडणार नाही.
  • हवा चांगली खेळुन पानांवरील पाणी लवकर वाळण्यासाठी झाडीची छाटणी नियमितपणे करा.
  • एका झाडावरुन दुसर्‍या झाडाचे काम करण्यापूर्वी उपकरणे स्वच्छ करा.
  • पावसाळ्यात, चिकटलेली पाने किंवा तपकिरी डाग दिसतायत का हे पहात चला.
  • बुरशीपासुन मुक्तता मिळविण्यासाठी सर्व संक्रमित फांद्या काढुन आणि गळलेल्या फांद्याही गोळा करुन जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा