तंबाखू

तंबाखूवरील बुरशीजन्य ठिपके

Rhizoctonia solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बारीक, पारदर्शक ठिपके येऊन थोडा किंवा अजिबात पिवळेपणा (वाळलेले) न दिसता व्रणांची सुरवात होते.
  • व्रण मोठे होऊन छोट्या चेंडूच्या आकाराचे किंवा त्याहीपेक्षा मोठे होतात आणि त्यातील केंद्रीत वर्तुळाकार संरचना हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
तंबाखू

तंबाखू

लक्षणे

जमिनीजवळील पानांच्या पृष्ठभागांवर बारीक २-३ मि.मी. चे पांढरे किंवा गव्हाळी रंगाचे प्राथमिक व्रण येतात. रोगाची प्रगती होत असताना त्याचा प्रसार बाहेरील बाजूस होत रहातो. प्राथमिक व्रणांसभोवताली वाळलेली वर्तुळे दिसतात. शेतात सर्वात खालील, सर्वात जुन्या पानांवर प्रथमत: बुरशीजन्य ठिपके उमटतात मग कालांतराने वरील पानांवर पसरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैविक भक्षकांच्या प्रभावकारीतेचे प्रदर्शन आर. सोलानीवर ट्रायकोडर्मा प्रजाती वापरुन केल्याचे आढळून आला आहे. टी. हर्झियानमला आर. सोलानीची वाढ थांबवते व तंबाखूच्या झाडांवरील रोगाचे नियंत्र चांगले केले जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मँकोझेब आणि अॅझोक्सिस्ट्रोबिन चा फवारणीच्या रुपात केल्याने बुरशीजन्य ठिपक्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

कशामुळे झाले

आर. सोलानी नामक मातीजन्य बुरशीच्या जंतुंमुळे नुकसान उद्भवते. ही बुरशी प्रामुख्याने हायफे किंवा स्क्लेरोशिया म्हणुन जमिनीत जगते. रोगाचा प्रसार हरित गृहातील लक्षणात्मक रोपांद्वारे किंवा बुरशीजन्य ठपक्यांचे जंतु जे नैसर्गित:च शेतात आणि आजुबाजुला उपस्थित असतात त्यांच्या संक्रमणामुळे होतो. ह्या रोगास मध्यम तापमान, उच्च आर्द्रता आणि पाने दीर्घकाळ ओली राहीलेली अनुकूल असतात. ह्या रोगाचे व्यवस्थित नियंत्रण न केले गेल्यास, पीक उत्पादन गंभीरतेने कमी करण्याची क्षमता ह्या रोगात आहे.


प्रतिबंधक उपाय

  • पीक फेरपालट आणि बुरशीनाशकांच्या संयुक्त वापराने रोगाचे व्यवस्थापन, प्रतिबंध केला जाऊ शकतो.
  • किमान दोन हंगाम तरी तंबाखू पीक न घेतल्यास आणि पीकफेरपालटात सोयाबीनचा वापर टाळल्यास बुरशीजन्य ठिपक्यांच्या घटना कमी केल्या जाऊ शकतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा