वाटाणा

शेतातील वाटाण्यावर काळे डाग

Mycosphaerella pinodes and Phoma medicaginis var. pinodella

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाने आणि शेंगांवर डाग येतात.
  • संक्रमित पाने आणि शेंगांवर गडद तपकिरी ते काळे व्रण किंवा ठिपके येतात.
  • दबलेली तपकिरी किंवा जांभळट काळी रंगहीनता दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
वाटाणा

वाटाणा

लक्षणे

फांद्या, पाने, शेंगा आणि वाटाण्यांवर काळ्या डागांमुळे व्रण येतात. आर्द्र परिस्थितीत, झाडीच्या खालच्या बाजुला, खालील पाने आणि फांद्यांवर लक्षणे लवकर दिसतात. पानाच्या पृष्ठभागावर बेढब आकाराचे छोटे तपकिरी डाग विखुरलेले आढळतात. दीर्घावलेल्या आर्द्र परिस्थितीत डाग मोठे होतात आणि एमकेकात मिसळतात ज्यामुळे खालील पाने पूर्णपणे करपतात. खालील फांद्यांवरील डाग जांभळट काळ्या रेषेसारखे दिसतात ज्यामुळे झाडाच्या बुडाशी कूज निर्माण होते आणि पीक कोलमडु लागते. शेंगांवरील डाग जांभळट काळे असतात आणि एकमेकात मिसळुन दबलेले भाग निर्माण होतात. संक्रमित बियाणे रंगहीन असुन जांभळट तपकिरी दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

प्रतिकारक वाण लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वाटाण्याच्या सर्व बियाणांवर मँकोझेबसारख्या बुरशीनाशकांचे बीजोपचार करण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

मयकोस्फेरेला पिनोडस, फोमा मेदिकागिनिस वार. पिनोडेला नावाच्या बुरशीमुळे नुकसान उद्भवते जी एकतर बियाणेजन्य, माती जन्य असते किंवा वाटाण्याच्या अवशेषात जगते. जेव्हा बुरशीच्या बीजाणूंचे उत्पादन होऊन वाटाण्याच्या जुन्या अवशेषात साठवले जातात आणि नविन पिकांवर वार्‍याद्वारे त्यांचे वहन होते तेव्हा बहुधा रोग स्थिरावतो. झाड वाढीच्या कोणत्याही अवस्थेत संक्रमण होऊ शकते. बीजाणूचे उत्पादन संक्रमित झाडांवरुन जवळपासच्या निरोगी झाडांवर वार्‍याने आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने होते. संक्रमित बियाणांची लागवड केल्यानेही रोग स्थिरावु शकतो. ओल्या हवामानात रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. कोरड्या वर्षात, संक्रमित बियाणांपासुन येणारे पीक रोगट नसु शकते पण ओल्या हवामानात रोग गंभीर होण्याची दाट शक्यता असते. बुरशी मातीत खूप वर्षांपर्यंत जगु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ वाण लावा.
  • लागवड करताना गेल्या वर्षीच्या वाटाण्याच्या खुंटांपासुन किमान ५०० मी.
  • अंतरावर लागवड करा.
  • जुने किंवा नुकसानीत बियाणे वापरणे टाळा कारण त्यामुळे कोवळ्या रोपात जोम कमी भरतो आणि संक्रमणाची संवेदनशीलता वाढते.
  • दाटीने लवकर पेरणी करणे टाळा कारण ह्यामुळे वाटाण्याची कोवळी रोपे जंतुस धार्जिणी होतात आणि दाट झाडीचे पीक उभे रहाते, ज्यामुळे कोलमड आणि उच्च आर्द्रता निर्माण होते; ह्या सर्वांमुळे रोग विकसित होण्याची जोखीम वाढीव असते.
  • शक्य होईल तेव्हा पीक फेरपालट करा.
  • ३ वर्षातुन एकदा पेक्षा जास्त वेळा त्याच जागी वाटाण्याची लागवड करु नये.
  • जर रोग झाला तर फेरपालटाची वेळ ४ वर्षे किंवा ५ वर्षातुन १ करावी.
  • संक्रमित वाटाण्याचे अवशेष आणि स्वत: पेरणी केलेली रोपे जाळुन किंवा उपटुन काढुन नष्ट करावीत.

प्लँटिक्स डाऊनलोड करा