तंबाखू

पिवळे खुजेपण

Fusarium/Pythium/Rhizoctonia complex

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाने पिवळी पडतात.
  • शेंड्याकडील भाग वळतात.
  • मूळ काळी पडतात.
  • जमिनीलगतचे खोडाचे भाग करपतात.
  • झाड वाळते.
  • पानांवर वर्तुळाकार गोल नक्षीचे करपलेले डाग दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
तंबाखू

तंबाखू

लक्षणे

झाडाचे शेंड्याकडील भाग मरगळण्यापपासून रोगाच्या सुरवातीची लक्षणे दिसु लागतात, नंतर हे भाग पिवळे पडतात आणि वाळतात ज्यामुळे झाडाची मर होते. जमिनीत मुळांजवळ जास्त पाणी साचून राहील्याने पिवळे खुजेपण किंवा "यलो डिसिज काँप्लेक्स" उद्भवतो ज्यामुळे मुळांना हवा मिळत नाही. ह्याच संदर्भात तंबाखूची मुळे खराब झाल्याने, पिवळे खुजेपणाशी संबंधित जंतुंच्या शिरकावास झाड संवेदनशील होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

जमिनीजन्य जंतुंना प्रतिकारक वाण लावा.

रासायनिक नियंत्रण

पिवळ्या खुजेपणाचे नियंत्रण रसायनिक पद्धतींनी केले जाऊ शकत नाही आणि पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन तसेच जमिनीत पाणी साचण्याने हे होते.

कशामुळे झाले

तंबाखूच्या झाडामध्ये प्राणवायूची कमतरता आणि कार्बन डायॉक्साईडची जास्त प्रमाणात सहनशीलता असते. आणि जास्तीची आर्द्रता, प्राणवायूची कमतरता तसेच उच्च तापमानात मूळ प्रणाली कोलमडते. तंबाखूची मुळे कोलमडल्याने फ्युसॅरियम प्रजाती, र्‍हिझोक्टोनिया सोलानी, पायथियम प्रजाती वगैरेसारखे पिवळ्या खुजेपणाशी संबंधित जंतुच्या शिरकावासाठी धार्जिणे होते. ह्याचे परिणाम हे विविध घटकांवर अवलंबुन आहेत जसे कि, वाढीची अवस्था, हवामान परिस्थिती, कालावधी आणि किती प्रमाणात मुळे प्रभावित झालेली आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • रोपवाटिकेत, दाटी टाळण्यासाठी बियाण्याचे योग्य प्रमाण वापरा.
  • पुनर्लागवड करताना दाट लागवड टाळा.
  • जमिनीत पाणी साचून राहील इतके पाणी देऊ नका.
  • जमिन घट्ट होऊ नये म्हणुन योग्य मशागत करा.
  • सरी उंच ठेऊन त्याच्यावर लागवड करा.
  • हरित आच्छादनाची लागवड केल्याने जमिनीचा पोत सुधारतो.
  • मातीजन्य जंतुंना जास्त सहनशील असणारी वाणे लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा