ऊस

पोक्का बोंग

Fusarium moniliforme

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • खोडाच्या वरच्या भागात विकृतता आणि बेढब आकार दिसते किंवा खोडास नुकसान होते.
  • कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला पिवळे धब्बे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

रोगाचे विकसन तीन मुख्या टप्प्यांनी होते. सुरवातीची लक्षणे असतात कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला पिवळे धब्बे आणि क्वचितच पात्याच्या इतर भागातही दिसतात. पाने सुरकुततात, मुडपतात आणि बारीक असतात. प्रभावित पानांची बूड ही सामान्य पानांपेक्षा लहान असतात. शेंडे कूज टप्पा हा थोडा गंभीर असतो ज्यात पानांची विकृती आणि मुडपणे जास्त स्पष्ट असते. लाल ठिपके मिसळतात आणि फुटव्यांच्या बुडाचा भागात कूज होऊन वाळतात. गंभीर संक्रमणात, कळ्या उगवतात आणि कांडीचा वरच्या भागाचे गंभीर नुकसान होते. तिसर्‍या टप्प्यास कोयत्याने कापल्यासारखे दिसणे म्हणतात ज्यात खोड किंवा फांदीवर कोयत्याने आडवा वार केल्यासारखे कापलेले दिसते. जर पाने सोलवटुन काढली तर मोठे, स्पष्ट पिवळे धब्बे खोडांवर दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा मध्यम प्रतिकारक वाण लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पोक्का बोएंग रोगास प्रभावीपणे कमी करण्यासाठी कॉपर ऑक्झीक्लोराइडसारख्या बुरशीनाशकांचा वापर करा.

कशामुळे झाले

फ्युसॅरियम बुरशीच्या विविध प्रजातींमुळे नुकसान होते: फ्युसॅरियम सबग्लुटिनान्स, फ्युसॅरियम सच्चारि, फ्युसॅरियम मोनिलिफ्रोम शेल्डन. जंतुंचा प्रसार प्रामुख्याने वार्‍याच्या झोताने होतो आणि हवेत उडालेले बीजाणू झाडाच्या पाने, फुले आणि खोडास, किड्यांद्वारे झालेल्या किंवा नैसर्गिक जखमेतुन आत शिरकाव करुन वस्ती करतात. दुय्यम संक्रमण हे संक्रमित बेणे, सिंचनाचे पाणी, पावसाने उडणारे पाणी आणि मातीतुन होते. जे बीजाणू फुटव्याच्या बुडात शिरकाव करतात तिथे ते ऊगवतात आणि बुडाच्या पानातील आतील भागात वाढतात. ह्यामुळे पाने छोटी आणि विकृत होतात. बीजाणूंचा प्रसार हा विविध हवामान परिस्थितीवर अवलंबुन असतो आणि कोरड्या हवेच्या काळानंतर येणार्‍या आर्द्र मोसमात जास्त ठळकपणे होतो. अशा परिस्थितीत पानांवरील संक्रमण झपाट्याने वाढते आणि प्रतिकारक वाणांच्या पानांवरही काही वेळा विशिष्ट लक्षणे दिसतात. नैसर्गिक परिस्थितीत झाडांच्या अवशेषात जंतु १२ महिन्यांपर्यंत जगु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी बेणे/बियाणे सामग्री वापरुन रोग होण्यास प्रतिबंध करावा.
  • पिकातुन काढलेल्या बेण्यांवर ९९% आर्द्रतेच्या ५४ डिग्री सेल्शियस तापामानात २.५ तास उष्णतेची प्रक्रिया करावी.
  • प्रभावित शेतात पीक फेरपालट राबवावा.
  • 'शेंडे कूज' किंवा 'कोयत्याने कापल्यासारखे दिसणे' हे ज्या ऊसावर किंवा बेण्यांवर दिसते त्यांना लगेच शेतातुन काढावे.
  • प्रभावित झाडांना मुळापासुन उपटून जाळावे.
  • रोगट पिकांची तोडणी शक्य तितक्या लवकर करावी.

प्लँटिक्स डाऊनलोड करा