हळद

हळदीच्या पानावरील धब्बे

Taphrina maculans

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या दोन्ही बाजुंवर अनेक बारीक, लंबगोलाकार, बेढब आकाराचे ठिपके येतात.
  • ठिपके एकमेकात मिसळुन बेढब व्रण तयार होतात.
  • झाड भाजल्यासारखे दिसते आणि हळकुंडाच्या उत्पादनात घट होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
हळद

हळद

लक्षणे

खालच्या पानांवर विशेषकरुन रोगाचा उद्भव होतो. एकेकटे छोटे ठिपके सुमारे १-२ मि.मी. रुंदीचे असतात आणि बहुधा आयताकार असतात. शिरांच्या बाजुने ठिपके येतात आणि एकमेकात मिसळुन मोठे बेढब व्रण तयार करतात. पहिल्यांदा ते फिकट पिवळे रंगहीन असतात पण नंतर ते मळक्या पिवळ्या रंगात बदलतात. संक्रमित पाने विकृत असतात आणि लालसर तपकिरी दिसतात. गंभीर बाबतीत झाडच भाजल्यासारखे दिसते आणि हळकुंडाचे उत्पादन घटते.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोगाचा प्रसार जास्त झालेला नसल्यास स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्स आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम असणार्‍या उत्पादनांनी संक्रमण कमी होऊ शकते. अशोक (पोलियांथिया लाँगिफॉलिया) झाडाच्या पानांचा अर्क किंवा कांद्यांचा घरी बनविलेला अर्क ही संक्रमणास कमी करु शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बियाणे सामग्रीवर पेरणीपूर्वी, मँकोझेबचे ३ ग्रा. / ली. पाणी किंवा कार्बेंडाझिमचे १ ग्रा. /ली. पाणी याचे बीजोपचार ३० मिनिटांसाठी करा आणि सावलीत वाळवा.

कशामुळे झाले

ही बुरशी प्रामुख्याने हवेतुन पसरते आणि खालील पानांवर प्राथमिक संक्रमण होते. यजमान झाडांच्या शेतात पडलेल्या वाळक्या पानांत ही लस तग धरते. दुय्यम संक्रमण पक्व झालेल्या अॅस्की (बुरशीच्या बीजाणूंची पिशवी) तील अॅस्कोस्पोर्स (बुरशीचे बीजाणू) मुळे होते आणि ताज्या पानांना संक्रमित करते. उन्हाळ्यात, जंतु जमिनीवर गळलेल्या पानांच्या ढिगार्‍यांवरील अॅस्कोजिनस पेशीत आणि जमिनीतील वाळलेल्या अॅस्कोस्पोर्स तसेच ब्लास्टोस्पोर्सवर आणि गळलेल्या पानांत जगतात. ह्या रोगास जमिनीतील जास्त आर्द्रता, २५ अंश तापमान आणि पाने ओली असणे भावते.


प्रतिबंधक उपाय

  • योग्य स्वच्छता राखा.
  • शेतातील संक्रमणाचे लसीकरण थांबविण्यासाठी संक्रमित आणि कोरडी पाने गोळा करुन जाळा.
  • रोगमुक्त भागातुनच बियाणे साहित्य निवडा.
  • शक्य होईल तेव्हा पीक फेरपालट करत चला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा