पेरु

हॅलोडर्मा पानांवरील ठिपके

Hyaloderma sp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर विटकरी रंगाचे ठिपके येतात.
  • ठिपके पसरतात आणि पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
पेरु

पेरु

लक्षणे

पानांच्या खालच्या बाजुस बुरशीची वाढ दिसते. ठिपक्यांमुळे पानगळ होते. निरोगी पानांवर व्रण पसरुन एकमेकात मिसळतात आणि ४-५ मि.मी. व्यासाचे बेढब ते अर्धगोलाकार व्रण पानांच्या पृष्ठभागावर दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत, कोणतीही जैविक नियंत्रण पद्धत माहितीत नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी पावसाळ्यात कॉपर ऑक्झीक्लोराईडची (०-३%) फवारणी करावी.

कशामुळे झाले

बुरशीमुळे नुकसान उद्भवते जी ओल्या हवामानात जुन्या पानांना प्रभावित करते. अधिक प्रगत टप्प्यावर आर्द्र हवामान परिस्थितीत, रोगामुळे पानांच्या मध्यावर मोठ्या प्रमाणात ठिपके येतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोग-अनुकूल परिस्थितीच्या दीर्घ कालावधीपूर्वी कॉपर द्रावणांचा वापर केल्यास संरक्षण मिळते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा