पेरु

पेरुवरील देवी रोग

Pestalotiopsis psidii

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बारीक, तपकिरी, तांबट वाळलेले भाग फळांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
पेरु

पेरु

लक्षणे

रोग बहुधा हिरव्या फळांना होतो आणि क्वचितच पानांवर दिसतो. फळांना लागण झाल्याची सर्वात आधीचे लक्षण म्हणजे बारीक, तपकिरी, तांबट रंगाचे वाळलेले भाग दिसणे. संक्रमणाच्या प्रगत टप्प्यावर, वाळलेले भाग गळल्याने साल फाटते. संक्रमित फळे अविकसित, टणक, विकृत आकाराची रहातात आणि गळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

फळांना जखम होऊ नये म्हणुन फोम नेट बॅग लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईडचे संरक्षक फवारणी केल्यास रोगाच्या प्रसारावर पुरेसे नियंत्रण मिळते. परागीकरणानंतर कोवळ्या फळांवर डायमेथोएट सारख्या आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी केल्यास सकारात्मक परिणाम मिळण्याचे अहवाल आहेत.

कशामुळे झाले

हा रोग बुरशीमुळे होतो आणि ह्याचा प्राथमिक स्त्रोत सूप्तावस्थेतील मायसेलियम असतो. बुरशीच्या झपाट्याने झालेल्या संसर्गामुळे फळास नुकसान होते. संक्रमणाचा दुय्यम प्रसार वार्‍यासह वाहणार्‍या लैंगिकरीत्या प्रजोत्पादीत बीजाणूंचे, पाणी उडण्याने, संक्रमित झाडाच्या जवळ असण्याने, जखमेतुन आणि संक्रमित पानांचे वहन केल्याने होतो. बुरशीची वाढ आर्द्र हवामानात, २० ते २५ अंश तापमानात, पुरेसा वारा न खेळणार्‍या दाट झाडीत होते.


प्रतिबंधक उपाय

  • उन्हाळी सिंचन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन चोख करुन रोग कमी करा.
  • फळांना जखम होऊ नये म्हणुन फळ योग्य आकाराची झाल्यानंतर फोम नेटची बॅग लावा.
  • हे जंतु प्रामुख्याने जखमांतुन आत शिरतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा