जव

जवास आच्छादणारी काजळी

Ustilago segetum var. hordei

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • काळी ओंबी, आक्रसलेली आणि विकृत आकाराची कूस.
  • बुटके झाड.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
जव

जव

लक्षणे

प्रभावित झाडे ओंबी लागेपर्यंत सहजासहजी कोणतीच लक्षणे दर्शवित नाहीत. संक्रमित ओंबी ही सुद्धा निरोगी ओंबी सोबत किंवा जवळपास त्याच वेळी धरतात. पण ती बहुधा फुलोर्‍याखालील पानातुन उगवतात. सर्वात दृष्य लक्षण असते रंगहीन ओंबी जी काळी असतात. प्रभावीत ओंबितील दाणे हे टणक, राखाडीसर पांढर्‍या त्वचेमुळे जागीच रहातात. तोडणीच्या जवळपास, बीजाणू पूर्णपणे दाण्यांची जागा घेतात. कूस विकृत आकाराची होतात. जवाच्या झाडांची वाढ खुंटते.

Recommendations

जैविक नियंत्रण

व्हिटेक्स नेगुंडो च्या पानांच्या भुकटीचे बीजोपचार प्रभावी असतात. ट्रायकोडर्मा हर्झियानम, टी. व्हिरिडे आणि स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्सचे बीजोपचार हे बुरशीनाशकांच्या नियंत्रणापेक्षा कमी प्रभावी असतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कार्बेंडाझिम ५० डब्लूपी (२.५ ग्रा.), मँकोझेब ५० डब्लूपी + कार्बेंडाझिम ५० डब्लूपी (१ ग्रा.), कार्बॉक्सिन ३७.५ डब्लूपी + थायराम ३७.५ डब्लूपी (१.५ ग्रा.) आणि टेब्युकोनाझोल २ डीएस (१.५ ग्रा.) प्रति १ किलो बियाणांच्या दराने बीजोपचार केल्यास रोगावर पूर्ण नियंत्रण मिळविता येते.

कशामुळे झाले

उस्टिलागो सेगेटम व्हार होर्डेइ नावाच्या जंतुंमुळे लक्षणे दिसतात. हा बियाणांच्या वर असतो म्हणजेच रोगट झाडाच्या ओंबी वरून बीजाणू निरोगी बियाणांच्या पृष्ठभागावर पसरतात. जेव्हा काढणीनंतर जवाची झोडपणी केली जाते तेव्हा बीजाणूंचे पुंजके फुटतात आणि असंख्या बीजाणू सोडले जातात. पुष्कळसे बीजाणू निरोगी ओंबींवर चिकटतात आणि बियाणे पेरले जाईपर्यंत सुप्तावस्थेत रहातात. जेव्हा जवाची पेरलेली बियाणे अंकुरतात तेव्हा बीजाणूही अंकुरतात आणि कोवळ्या रोपास संक्रमित करतात. ऊबदार, ओलसर, आम्ल जमिनी कोवळ्या रोपावरील संक्रमणास धार्जिण्या असतात. अंकुरण्याच्या काळात मातीचे तापमान १० ते २१ अंश असणे हे रोगास अनुकूल असते. सुट्या काजळी पासुन आच्छादणार्‍या ओंबीस वेगळे काढणे काही वेळा कष्टाचे असते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • रोगमुक्त लागवड सामग्री वापरा.
  • मध्यम कोरड्या जमिनीत पेरणी करा.
  • बियाणे २.५ सें.मी.
  • खोल पेरल्याने रोगाच्या घटना कमी केल्या जाऊ शकतात.
  • जवाची लागवड शक्य झाल्यास आम्ल जमिनीपेक्षाही अल्काली किंवा मध्यम जमिनीत करावी.
  • संक्रमित झाडे मुळासकट काढुन जाळावीत.

प्लँटिक्स डाऊनलोड करा