द्राक्षे

बुंधा कूज

Cylindrocarpon

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बेचके लहान असतात.
  • पानांचा आकार आणि झाडी कमी असते.
  • पाने पिवळी पडतात आणि मरगळतात.
  • मूळांवर आणि जमिनीच्या वरील खोडाच्या सालीवर गडदडाग येतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

कोवळ्या प्रभावित वेलींच्या बेचक्या लहान असतात, पानांचा आकार आणि झाडी कमी असते. ३-५ वर्षांची जुनी वेल पिवळी पडते, मरगळते आणि अखेरीस अकालीच जमिनदोस्त होते. मूळेही कमी आणि दबलेली असतात, त्यावरही गडद डाग दिसतात ज्यामुळे पूर्ण रोपच मरगळते किंवा मरते. मूळांचा भाग जांभळट रंगहीन होणेही सामान्य आहे. इतर काही लक्षणात येते, प्रभावित वेलीत जोम कमी असतो आणि खोडही छोटेच असते, बेचके लहान असतात, लाकडी भाग असमानरीत्या पक्व होतो. प्रभावित वेलीचा कणा दबलेला छोटा असतो आणि रंगहीनही होतो. कोवळ्या वेलींवर झपाट्याने प्रभाव पडतो तर जुन्या वेली हळुहळु मरतात. जेव्हा कोवळ्या वेलींवर हल्ला होतो तेव्हा त्या चटकन मरतात पण जशी वेल जुनी होत जाते तस संक्रमणामुळे हळुहळु मरत जाते आणि पूर्ण मरायला सुमारे एक वर्ष लागत.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रायकोडर्मा प्रजातींना छाटणीच्या जखमांवर, कलमांवर आणि बियाणंवर फक्त प्रतिबंधक उपाय म्हणुन वापरावे. रोपवाटिकेतील निष्क्रीय वेलींना ५० अंश सेल्शियसच्या गरम पाण्यासह ट्रायकोडर्माचे उपचार करावेत. ट्रायकोडर्मा प्रजाती, मायकोर्‍हिझे आणि कंपोस्ट वापरुन मातीत सुधार करविल्यास रोपांची प्रतिकारकता वाढविण्यात प्रभावी ठरते पण ताण परिस्थितीप्रमाणे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजतागायत तरी ह्या बुरशीविरुद्ध कोणतीही रसायनिक पद्धत विकसित झालेली नाही.

कशामुळे झाले

काळ्या फूट कूजीची द्राक्षाच्या वेलीवरील लक्षणे ही सायलिनडरोकॅपोन नावाच्या जमिनीतील पुष्कळ प्रकारच्या बुरशींमुळे उद्भवतात. ही बुरशी प्रामुख्याने २-८ वर्षांच्या द्राक्ष वेलींना प्रभावित करते. वेलीच्या जखमातुन आणि मुळातील नैसर्गिक छिद्रातुन ही बुरशी वेलीत प्रवेश करते. जर द्राक्षवेलींना पाणी किंवा पोषकांचा ताण येत असेल तर त्या ह्या रोगास जास्त धार्जिण्या असतात. कोवळ्या रोपांवर जास्त पिकांचा भार, पाण्याचा चांगला निचरा न होणे आणि घट्ट झालेली माती रोगाच्या वाढीस पूरक असते.


प्रतिबंधक उपाय

  • पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीत किंवा उंचावलेल्या वाफ्यांत वेलींची लागवड करा.
  • फक्त निरोगी आणि चांगल्या प्रतिच्या वेलीच लावा.
  • ठिबक सिंचन वापरुन आणि योग्य खत देऊन रोपांचा ताण टाळा.
  • रोगाचा शिरकाव होऊ नये म्हणुन छाटणी किंवा कलमाच्या जखमा चांगल्या स्वच्छ ठेवा.
  • वनस्पती वाढ नियंत्रक किंवा बुरशीनाशके असणार्‍या मेणात वेलींना कलमा केल्यानंतर लगेच बुचकळा.
  • शक्य झाल्यास परत लागवड करण्यापूर्वी थोडा काळ ओसाड सोडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा