द्राक्षे

द्राक्षावरील काळी कूज

Phyllosticta ampelicida

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर गडद किनारीचे डाग येतात.
  • कोंब, फांद्या आणि पानांचे देठही प्रभावित होतात.
  • काळी फळ कूज दिसते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

पानांवर गडद रेषेची किनार असलेले अनियमित डाग येतात . कोंब, फांद्या आणि पानांचे देठांवरही ह्या डागांची लक्षणे दिसतात. जर पानाचा देठ प्रभावित झाला असेल तर पूर्ण पान वाळते. मण्यांवर सुरवातीपासुनच राखाडीसर रंगहीनता दिसते जी नंतर लालसर तपकिरी किंवा जांभळ्या डागात बदलते. फळे विकृत आकाराची होतात आणि अखेरीस आक्रसुन काळी होऊन वाळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

फुलोर्‍याच्या टप्प्यानंतर लगेचच बॅसिलस थुरिंगिएनसिसची फवारणी आपण घेऊ शकता.

रासायनिक नियंत्रण

रसायनांचा वापर प्रतिबंधक उपाय म्हणुन केला जातो. कप्तान + मायकोब्युटानिल किंवा मँकोझेब + मायकोब्युटानिलचे फवारे फुलधारणेपूर्वी सुमारे दोन अठवडे आधी सुरु करावेत. अगदी फुल उमलण्यापूर्वी आपण कार्बारिल किंवा इमिडक्लोप्रिडही वापरु शकता. फुल उमलल्यानंतर मँकोझेब + मायकोब्युटानिल, इमिडाक्लोप्रिड किंवा अॅझाडिरॅक्टिनची फवारणी घ्या. फुले उमलल्यानंतर दहा दिवसांनी आपण कप्तान आणि सल्फरचे मिश्रणही वेलींवर वापरु शकता. फुलोर्‍यानंतर सुमारे ३-४ अठवड्यांनी बहुतेक द्राक्ष वाणे प्रतिकारक होतात म्हणुन रसायनिक फवारणी त्यावेळेस करणे टाळावे.

कशामुळे झाले

फिलोस्टिक्टा अॅम्पेलिसिडा नावाच्या बुरशीमुळे नुकसान उद्भवते. जंतु संक्रमित कोंब किंवा वेलींवरील अथवा जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या फळात विश्रांती घेतात. हलक्या पावसाने बीजाणू बाहेर पडतात आणि वार्‍याने विखुरतात. वाढीसाठी इष्टतम परिस्थिती आहे २५ अंश सेल्शियस तापमान आणि लागोपाठ किमान ६ तास तरी पाने ओली रहाणे. बुरशीला उबदार आणि आर्द्र हवामान भावते. फळ उत्पादन कमी भरते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास जास्त प्रतिकारक वाण घ्या.
  • वेलीवरुन वाळलेली फळे काढा.
  • संक्रमित लाकुड आणि वेलींना तोडणीनंतर काढुन नष्ट केले पाहिजे.
  • तसेच नंतर द्राक्षाच्या मळ्यातुन संक्रमित पानेही काढा.
  • आपला द्राक्षाचा मळा तणमुक्त राखा.
  • हवा चांगली खेळती असु द्यात आणि प्रकाशही भरपूर येऊ द्यात.
  • झाडोरा मोसमापूर्वी दर वर्षी वेली छाटा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा