द्राक्षे

द्राक्षावरील कडू कूज (बिटर रॉट)

Greenaria uvicola

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पक्व फळांवर गडद व्रण येतात.
  • फळे अनियमित आकाराची काजळी काळी होतात.
  • चव कडू आणि बुरशीची असते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

अतिशय दृष्य लक्षणे मण्यांवर दिसतात. पक्व होणार्‍या फळांवर तपकिरीसर, पाणी शोषल्यासारखे डाग दिसणे ही सुरवातीची लक्षणे आहेत. मणी पक्व होऊ लागतानाच संसर्गास संवेदनशील होतात. एकदा का फळे संसर्गित झाली तर ती मऊ पडतात आणि त्यांच्या पृष्ठभागावर केंद्रीत वर्तुळांच्या रुपात बुरशीचे बीजाणू रचना तयार होतात. केंद्रीत वर्तुळांचे डाग झपाट्याने वाढतात आणि पूर्ण मणीच बहुधा फारच थोड्या काळात संक्रमित होते. जेव्हा फिक्या रंगाचे फळ संक्रमित होते तेव्हा ते मणी तपकिरी होतात. सुमारे २-३ दिवसांनी मण्यांची साल काळ्या फोडांनी फुटते. आर्द्र हवामानात फोड एकमेकात मिसळुन अनियमित आकाराचे फोड फळांच्या पृष्ठभागावर तयार होतात. फळांची साल फाटते आणि फळ आक्रसुन काळ्या ममीत बदलते जे काळ्याकूजीसारखे, फिलोस्टिक्टा अँम्पेलिसिडा सारखेच दिसते. कोवळ्या कोंबांतही आणि फळांच्या फांद्यांवरही लक्षणे विकसित होऊ शकतात पण इतकी स्पष्ट नसतात. संक्रमित पानांवर छोटे, खोलगट, पिवळ्या प्रभावळीचे, लालसर तपकिरी ठिपक्यांच्या रुपात लक्षणे दिसतात. बीजाणू, कोंब, फुल आणि फळांचे देठांनाही बीजाणू संक्रमित करु शकतात. जेव्हा फळांचे देठ बुरशीने संक्रमित होतात तेव्हा ते फळ पक्व होईपर्यंत निष्क्रिय होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

तेले, फॉस्फरस अॅसिड, पोटॅशियम बायकार्बोनेट, पोटॅशियम मोनोफॉस्फेट, ऑक्झिडेट, कंपोस्ट टी, सारख्या जैव किंवा कमी जोखीम असणार्‍या संयुगांसारख्यांचा वापर केल्याने कडू कूजीच्या घटना कमी करण्यात मदत मिळते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उबदार मोसमात फुलधारणेपासुन ते तोड्यापर्यंत फळांना, खासकरुन संवेदनशील वाणास, बुरशीनाशकाने संरक्षित करा. उन्हाळ्याच्या सुरवातीपासुन ते मध्यापर्यंत, डाऊनी मिल्ड्यू आणि काळ्या कूजीसारख्या इतर रोगांना लक्ष्य करणार्‍या बुरशीनाशकाचे फवारे घेतल्याने रोगाचे नियंत्रण केले जाऊ शकते. शेतात आणि साठवणीत रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आयप्रोडियॉन ७५ डब्ल्यूजी (०.२%), बिटरटॅनॉल २५ डब्ल्यूपी (०.१%) आणि थियोफेनेट मिथाइल (०.१%) चे फवारे घ्यावेत.

कशामुळे झाले

ग्रीनेरिया युव्हीकोला नावाच्या बुरशीमुळे नुकसान उद्भवते जी द्राक्षाच्या मळ्यातील बहुधा प्रत्येक वेलीच्या कचर्‍यात खास करुन वाळलेल्या फळांच्या कचर्‍यात विश्रांती घेते. बुरशीच्या पेशी वेलीच्या कचर्‍यात वाढतात आणि बीजाणू निर्मिती करतात. उबदार, आर्द्र हवामान आणि पावसाळी हवा बुरशीच्या वाढीस आणि बीजाणू निर्मितीस अनुकूल असते. बीजाणू निरोगी फळांच्या संपर्कात आल्यानंतर एक अठवड्याने लक्षणे दृष्य होतात आणि जर मण्यास जखम झालेली असेल तर लक्षणे दृष्य होण्यास कमी वेळ लागतो. बुरशीचे जंतु बहुधा कमी तापमानात चांगलेच सक्रिय असतात. फळांवर उपस्थित असलेले बीजाणू पावसाच्या उडणार्‍या पाण्याने इतर फळांवर पडतात आणि तिथे परत संक्रमण सुरु करतात. कडू कूजीचा गोंधळ बहुधा काळ्या कूजीशी केला जातो; पण काळ्या कूजीचे जंतु कच्च्या फळांना संक्रमित करतात तर कडू कूजीचे जंतु पक्व फळांना संक्रमित करतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण किंवा उशीरा पक्व होणारे वाण उपलब्ध असल्यास वापरा.
  • तण आणि शोषकांचे नियंत्रण करुन हवा चांगली खेळती कराआणि प्रकाश आतपर्यंत पोचू द्यात.
  • पाने एकसारखी वाढण्यासाठी योग्य छाटणी आणि दिशा द्या किंवा फुटवे काढा.
  • शक्य असल्यास प्रचलित वार्‍याच्या देशेने ओळींची लागवड करा.
  • मण्यांना जखमा होऊ नयेत म्हणुन किडे, पक्षी आणि इतर द्राक्षावरील रोगांचे नियंत्रण करा.
  • द्राक्षाच्या मळ्यात स्वच्छता राखा.
  • ममीफाइड द्राक्षे वेलीवरुन काढुन टाका.
  • बुरशीचे नुकसान कमी करण्यासाठी वेलींचा कचरा नष्ट करा.
  • बीजाणू बरेच कमी करण्यासाठी जुन्या काटक्या, गुच्छ आणि वेलीचे इतर भाग काढुन नष्ट करा.
  • ममीज (वाळलेली टणक द्राक्षे) झाडीतुन काढुन टाकुन मळ्यात हवा चांगली खेळती करा.
  • मोसमात झाडोर्‍याचे व्यवस्थापन करुन हवा चांगली खेळती करा आणि त्या काळात पाने ओली रहाण्याचे प्रमाण कमी करा.
  • योजनेबरहुकूम पानांची छाटणी केल्यास पाने ओली रहाण्याचा काळ कमी होतो.

प्लँटिक्स डाऊनलोड करा