ऊस

ऊसावरील वलयाकार ठिपके

Epicoccum sorghinum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात.
  • बारीक तांबट तपकिरी ठिपके येतात.
  • गव्हाळ रंगाच्या केंद्राभोवती स्पष्ट लाल तपकिरी कडा असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

सुरवातीच्या लक्षणात, बारीक, लांबट, अंडाकृत गडद हिरवे ते लालसर तपकिरी ठिपके पिवळ्या प्रभावळीसह येतात. जुन्या लक्षणांचे वैशिष्ट्य आहे कि मोठे आणि लांबट डागांच्या किनारी अनियमित आणि लालसर तपकिरी असतात. डाग एकमेकात मिसळुन मोठे धब्बेही तयार होतात ज्यामुळे वाळणे आणि करपणे होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

कॅल्शियम सिलिकेट स्लॅगचा वापर जमिनीत बदल करण्यासाठी करा ज्यामुळे वलयांकित डागांची गंभीरता कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजपर्यंत या बुरशीविरुद्ध कोणतेही रसायनिक नियंत्रण उपचार विकसित करण्यात आलेले नाहीत.

कशामुळे झाले

एपिकोक्कम सोरघिनम नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात आणि तिच्या बीजाणूंचा प्रसार वार्‍याने किंवा पावसाने होतो. बुरशीला वाढण्यासाठी ऊबदार, आर्द्र परिस्थिती लागते. हे सामान्यत: जुन्या पानांवर परिणाम करते, म्हणूनच हा एक अल्प रोग मानला जातो ज्याला फारच कमी आर्थिक महत्त्व नाही.


प्रतिबंधक उपाय

  • कमी संवेदनशील वाण लावा.
  • तांबेरा किंवा काणीला संवेदनशील असलेले वाण टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा