ज्वारी

ज्वारीवरील तांबेरा

Puccinia purpurea

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर खालच्या बाजुला सूक्ष्म ठिपके येऊन हळुहळु जांभळट, थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
  • ते गोल ते अंडाकृति आकाराचे असुन विखुरलेले किंवा पुंजक्याने असतात.
  • पर्णकोषावर आणि फुलांच्या फांदीवरही लक्षणे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ज्वारी

लक्षणे

१-१.५ महिन्याच्या झाडात बहुधा लक्षणे दिसतात. वेगवेगळ्या रंगाचे (जांभळे, गव्हाळ किंवा लाल) सूक्ष्म ठिपके खालच्या पानांवर प्रथम येतात. प्रतिकारक वाणांत लक्षणे यापलिकडे जात नाहीत. संवेदनशील वाणात मात्र जसे हे ठिकपे बीजाणूंनी भरतात तसे ते पावडरीसारखे, जांभळट, थोडेसे उंचावलेले, गोल ते लंबगोलाकार आकाराच्या फोडात बदलतात. ते विखुरलेले किंवा पुंजक्यानेही असतात आणि जसे झाडाचे वय वाढते तसे ते जास्त गडद होऊ लागतात. जास्तच संवेदनशील वाणात या फोडांनी पूर्ण झाड भरुन जाते आणि संक्रमित शेतच तपकिरी दिसु लागते. फुलाच्या फांदीवर किंवा पर्णकोषावरही फोड सापडु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

पुकसिनिया पुरपुरियाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार अजुनपर्यंत तरी उपलब्ध नाहीत. या रोगाचा सामना करण्यासाठी मदत होण्यासारखी काही माहिती आपल्याला असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संवेदनशील वाणांवर बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. हेक्झाकोनाझोल (०.१%), डायफेनकोनाझोल (०.१%) आणि प्रॉपिकोनाझोल (०.१%) यांवर आधारीत उत्पाद रोगाच्या नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकतात. लक्षणे दिसताक्षणीच या बुरशीनाशकांचे दोन फवारण्या, १५ दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस केली जाते.

कशामुळे झाले

पुकसिनिया पुरपुरिया नावाच्या बुरशीमुळे रोग उद्भवतो जी फक्त थोड्या काळासाठीच जमिनीत आणि संक्रमित अवशेषात जगते. म्हणुन हिला विश्रांती घेण्यासाठी पर्यायी यजमानांची जसे कि गवत किंवा इतर तणांची उदा. क्रिपिंग वुडसॉरेल (ऑक्झालिस कॉर्निक्युलाटा) गरज भासते. बीजाणूंचे वहन फार अंतरापर्यंत वार्यावने आणि पावसाने होते. या रोगाच्या विकासासाठी जास्त सापेक्ष आर्द्रता (जवळपास १००%), दव, पाऊस आणि थंड (१०-१२ अंश) तापमान पूरक असते. उष्ण, कोरडे हवामान बुरशीचा विकास आणि बुरशीच्या घटना हळु करते किंवा बाधा आणते. काही बाबतीत संक्रमित पाने मरगळणे आणि नष्ट होऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • स्थानिकरीत्या उपलब्ध असलेली प्रतिकारक वाणे लावा.
  • प्रमाणित स्त्रोताकडील निरोगी बियाणेच वापरा.
  • संक्रमणाची इष्टतम परिस्थिती टाळण्यासाठी हंगामात लवकर पेरणी करा.
  • लवकर पक्व होणारी वाणे लावा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • संक्रमित रोपे काढुन नष्ट (उदा.
  • जाळुन) करा.
  • इतर यजमान झाडातील संक्रमण होऊ नये म्हणुन तण व्यवस्थापन चोख करा.
  • संवेदनशील नसलेल्या पिकांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा