मका

पानावरील काळपट ठिपके

Phyllachora maydis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या दोन्ही बाजुंना छोटे, उंचवटलेले ठिपके येतात.
  • सभोवताली तपकिरीसर व्रण येतात, "माशाच्या डोळ्यां'सारखी लक्षणे दिसतात.
  • संपूर्ण पान ठिपक्यांनी भरते आणि वाळते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

पानांच्या दोन्ही बाजुंना काळ्या केंद्राचे छोटे, उंचवटलेले पिवळे तपकिरी ठिपके येण्याने पहिली लक्षणे दिसतात. ठिपक्यांभोवती गडद कडांचे गोलाकार, तपकिरी व्रण असु शकतात ज्यांना सामान्यपणे "फिश आय - माशाचा डोळा" म्हटले जाते. गोलाकार, अंडाकृती, काहीवेळा कोणाकृती किंवा अनियमित आकाराचे ठिपके एकमेकात मिसळुन १० मि.मी. लांबीचे पट्टे तयार करतात. पूर्ण पानच ठिपक्यांनी भरते आणि पानाच्या आजुबाजुचा भाग वाळतो. लक्षणे प्रथमत: खालील पानांवर दिसतात आणि वरच्या पानांवर पसरत जातात. गंभीर संक्रमण झाल्यास डाग कुसावर आणि पर्णकोषावरही दिसतात. २१ ते ३० दिवसात पाने पूर्णपणे वाळतात. ह्यामुळे बाजारमूल्य कमी होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण उपलब्ध नाही. जर आपणांस काही माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजतागायत, या रोगावर कोणतेही रसायनिक उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस काही माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

कशामुळे झाले

बुरशीच्या तीन प्रजातींच्या परस्पर क्रियेमुळे लक्षणे उद्भवतात: फिलॅकोरा मेडिस, मोनोग्राफेला मेडिस आणि हायपेरपॅरासाइट कोनियोथिरियम फिलाकोरे. पी. मेडिसच्या संक्रमणानंतर दोन ते तीन दिवसांनी, एम. मेडिसद्वारे संक्रमण होते. बुरशी झाडाच्या अवशेषात ३ महिने किंवा जास्त काळ जगू शकते. बीजाणूंचा प्रसार वारा आणि पावसाने होतो. १६-२० अंश थंड तापमान आणि उच्च सापेक्ष आर्द्रता रोगाच्या उद्रेकास अनुकूल आहे. म्हणुन नदीकिनारी असलेली शेते या रोगास धार्जिणी आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • झाडाच्या खालच्या पानांचे, छोट्या, उंचावलेल्या, चमकदार, गडद ठिपके किंवा तपकिरी व्रणांसाठी निरीक्षण करा.
  • संक्रमित झाडांचे अवशेष नांगरुन गाडा किंवा काढुन नष्ट करा.
  • वेगळ्या पिकासह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा