सोयाबीन

सोयाबीन फांदीवरील करपा

Diaporthe phaseolorum var. sojae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फांद्यांवर, देठांवर आणि शेंगांवर गडद ठिपक्यांच्या आडव्या ओळी दिसतात.
  • दाण्याची प्रत कमी भरते.
  • पांढरट बुरशी दाण्यांच्या पृष्ठभागावर दिसते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

फांदी करप्याचे सर्वात प्रकर्षाने दिसणारी लक्षणे हे पिक्निडियाची (बुरशीचे बीजाणू) उपस्थिती होय, जे बारीक, काळे उंचवटलेले ठिपके आडव्या रेषेत पसरलेले असतात जे फांद्या, शेंगा आणि गळलेल्या देठांना हंगामाच्या शेवटी लागण करतात. संक्रमित झाडांचे वरचे भाग पिवळे पडुन वाळतात. फांदी करप्याने प्रभावित झाडांचे दाणे बहुधा फुटलेले, आक्रसलेले आणि निस्तेज असुन त्यावर राखाडी बुरशी पसरलेली असते. संक्रमित झाडांचे भाग अकालीच वाळतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

या रोगासाठी प्रभावी जैव नियंत्रण पद्धत उपलब्ध नाही. जर आपणांस ह्याच्या घटना कमी करणारी किंवा लक्षणांची गंभीरता कमी करणारी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. दाणे येण्याच्या सुमारास बुरशीनाशकांची फवारणी केल्यास दाण्यांची प्रत राखता येते. शेंगधारणेपासुन ते शेंगांच्या उशीराच्या टप्प्यापर्यंत बुरशीनाशकांचा वापर केल्याने बियातील संक्रमण घटना कमी होतात. पेरणीपूर्वी संक्रमित बियाणांवर (बेनोमिल) बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी.

कशामुळे झाले

डायापोर्थे फेसियोलोरम जिला फोमोप्सिस सोजेही म्हटले जाते, नावाच्या बुरशीच्या प्रजातीमुळे फांदी करपा होते. हिवाळ्यात संक्रमित बियाणे आणि पिकांच्या अवशेषात बुरशी जगते. संक्रमित बियाणे आक्रसलेले, फुटलेले आणि पांढर्‍या बुरशीच्या आवरणाने झाकलेले असतात. गंभीर संक्रमण झालेल्या बिया उगवत नाहीत. शेंग विकसन आणि पक्व होण्याच्या काळात उबदार ओले हवामान जास्त काळ राहील्यास रोगाचा प्रसार शेंगांपासुन बियांपर्यंत होण्यास अनुकूल असते. शेंगा भरण्याच्या सुमारास असलेली फारच ओली परिस्थिती फांदी करपा संक्रमणास अनुकूल असते. जिवाणूंमुळे उत्पादनाचे मोठे नुकसान होते आणि बियांची प्रत खालावते.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीसाठी चांगल्या प्रतीचे आणि रोगमुक्त बियाणे वापरा.
  • ज्या शेतात पूर्वी फांदी करपा आला असेल तिथे सोयाबीनची लागवड करणे टाळा.
  • शेंगा भरु लागल्यापासुन ते पक्व होईपर्यंत दर दोन अठवड्याला फांदी करप्यासाठी झाडांची तपासणी करा.
  • व्हेलव्हेट लीफ आणि पिगवीडसारख्या पर्यायी यजमान तणांपासुन शेत मुक्त ठेवा.
  • उशीरा लागवड केल्यास फांदीकरपा होण्याचे संभव वाढतात कारण झाडांना जास्त थंड आणि ओल्या हवामानाचा सामना करावा लागतो जो रोग विकसनास अनुकूल आहे.
  • वेळशीर काढणी आणि योग्य मशागत केल्यास लशींचे प्रमाण कमी होते.
  • गहू किंवा मक्यासारख्या यजमान नसलेल्या पिकांसह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा