भुईमूग

फळांवरील बुरशी

Aspergillus spp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फ़ळांच्या टरफलाची रंगहीनता आणि फळांची कूज, खासकरुन उघडल्यानंतर.
  • पिस्त्यावरील उपद्रवांनी हल्ला केलेली फळे जास्त संवेदनशील असतात.

मध्ये देखील मिळू शकते

8 पिके

भुईमूग

लक्षणे

जर फळे पक्व होण्याच्या सुमारास दमट हवामान राहिले तर पुष्कळशा बु्रशी घरे करतात आणि पिस्त्याच्या फळांना कूज लागते. ह्याचे मुख्य लक्षण टरफले रंगहीन होणे आणि काही वेळा वासहीन आणि रंगहीन ऍफ्लोटॉक्सिन उत्पन्न होणे असते. कोणती किंवा किती बुरशी लागली आहे ह्याप्रमाणे रंगहीनता आणि कूज कमी किंवा जास्त ठळकपणे दिसते. बहुधा टरफले फिकट तपकिरी ते पिवळे किंवा तपकिरी होतात. टरफलांखाली, कवचाच्या आतल्या बाजुला बुरशीच्या वाढीची लक्षणे दिसतात ज्यामुळे त्यांवर डाग येतात. टरफले बहुधा कवचाला चिकटतात. उघडलेली फळे किंवा ज्यावर किड्यांनी हल्ला केला आहे ती खासकरुन प्रभावित होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या रोगावर कोणतेही परिणामकारक जैविक उपचार नाहीत. तरीही, कॉपरवर आधारीत जैविक बुरशीनाशकांनी, अनुकूल हवामान परिस्थितीतील वापरात काही मान्य होण्यासारखे परिणाम दर्शविले आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेगास्टिग्मस पिस्ताशिये आणि युरिटोमा प्लोट्निकोवि चे नियंत्रण कीटनाशके वापरुन करा. क्लोरोथॅलोनिल (२०० मि.ली. प्रति १०० ली. ) किंवा कॉपर वर आधारीत उत्पाद वापरुन प्रभावित झाडांना प्रतिबंधक उपचार करा. काढणीच्या शेवटीही वापर केल्यास फार परिणामकारक असतो कारण त्यामुळे रोग फळांत विश्रांती घेऊ शकत नाही. वापराची वेळ, शिफारशीत मात्रेा वापर आणि अॅटोमायझरची गती ह्यावर उपचारांचे परिणाम अवलंबुन असतात.

कशामुळे झाले

अॅस्परगिलसच्या पुष्कळ प्रजातींमुळे पिस्त्यातील फळकूज उद्भवते, पण पेनिसिलियम, स्टेमपफिलियम किंवा फ्युरॅशियमच्या काही प्रजातींमुळेही होऊ शकते. रोग बहुधा किड्यांच्या संक्रमणाशी संबंधित आहे खासकरुन पिस्ताच्या बियांवरील चॅलसिड (मेगास्टिग्मस पिस्ताशिये) आणि पिस्त्याच्या बियांवरील वॅस्पस (युरिटोमा प्लोट्निकोवि)शी. ह्या उपद्रवांनी केल्या छिद्रातुन बुरशीचा शिरकाव होतो. फळे पक्व होण्याच्या सुमारास उच्च तापमान, ओले आणि दमट हवामान हे रोगाला अनुकूल असते, जरी अॅस्परगिलस जातीचे संक्रमण नेहमीपेक्षा कोरड्या हवेत झाले असले तरी. अंधार आणि कोंदट हवासुद्धा रोगाच्या प्रसारास हातभार लावते. वसंत ऋतुत उशीरा आणि उन्हाळ्यात लवकर पाणी न दिले जाणे ह्यामुळे फळे फुटतात आणि रोगाच्या चक्रासाठी अनुकूल होतात.


प्रतिबंधक उपाय

  • पिस्ताचिया अॅटलांटिकाचे कलम वापरु नका करण ह्यामुळे जास्त संख्येने फळे अकाली उघडतात.
  • वसंत ऋतुत उशीरा आणि उन्हाळ्यात सुरवातीला योग्य पाणी पुरवठा करा कारण दुष्काळानेही फळे उघडतात.
  • पिस्त्याला फार काळ अंधार्‍या, हवा चांगली खेळती नसलेल्या जागेत ठेऊ नका.
  • मेगास्टिग्मस पिस्ताशिये (पिस्त्याच्या बियाणातील चॅलसिड) आणि युरिटोमा प्लोंट्निकोवि (पिस्त्याच्या बियाणावरील वॅस्पस) यांचे हल्ले टाळा.
  • हंगामात उशीरा काढणी करणे टाळा आणि जेव्हा हवामान दमट आणि ओले असते तेव्हा काढणी करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा