टोमॅटो

फ्युसारियम खोडकुज

Fusarium solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • लहान शिरा साफ होतात.
  • पाने पिवळी पडतात.
  • पाणी आणि पोषकांचे वहन करणारे भाग तपकिरी पडतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


टोमॅटो

लक्षणे

पानांवरील लहान शिरा साफ होणे आणि पाने पिवळी पडणे हे रोगाचे प्राथमिक लक्षण आहे. कोवळ्या रोपात फक्त बारीक शिराच साफ होण्याचे लक्षण दिसते. नंतर देठ मरगळतात. खालच्या पानांवर पिवळेपणा प्रथम दिसतो. ही पाने मरगळतात आणि अखेरीस गळतात, ज्यामुळे लक्षणे पुढच्या पानांवर उमटतात. नंतरच्या टप्प्यावर, वाहक प्रणाली तपकिरी होते. खालची पाने आणि नंतर झाडाची सर्व पाने गळतात. झाडाची वाढ खुंटून मर होते. खोडावर मऊ, गडद तपकिरी किंवा काळे कँकर्स (देवीचे व्रण) उमटतात, बहुधा जखमांच्या आणि पेरांच्या जागी ज्यामुळे खोड वेढले जाते. व्रण फिकट नारिंगी रंगात विकसित होतात आणि त्यावर खूप बारीक दंडाकृती आकाराची बुरशीची (पेरिथेशिया) बीजाणू संरचना दिसते. पांढरी कापसासारखी बुरशीची वाढ झाडांवर दिसु शकते. संक्रमण झाल्यास मूळ गडद तपकिरी, मऊ आणि पाणी शोषल्यासारखी होतात. मिरीच्या फळांवर काळे, पाणी शोषल्यासारखे डाग पुष्पकोषांच्या सुरवातीला दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

अनेक जैविक नियंत्रक एजंटस ज्यात जिवाणू आणि अरोगी जंतु जसे कि एफ. ऑक्झिस्पोरम येतात जे या जंतुंसह स्पर्धा करतात, त्यांचा वापर फ्युसॅरियम मरसाठी काही पिकात करण्यात आलेला आहे. ट्रायकोडर्मा व्हिरिडे १% डब्ल्यूपी किंवा ५% एससी याप्रमाणे वापरुन बीजप्रक्रिया (१० ग्राम प्रति किलो बियाणे) केला गेला आहे. बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्सवर आधारीत अन्य उत्पादही प्रभावी आहेत. ट्रायकोडर्मा हरझियानमलाही जमिनीत वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर इतर कोणतेही उपाय प्रभावी ठरत नसतील तर जमिनीवर आधारीत बुरशीनाशके दूषित भागात वापरावीत. पेरणी / रोपणी करण्यापूर्वी जर जमिनीत कॉपर ऑक्झिक्लोराइड ३ ग्राम प्रति ली. पाण्यात मिसळुन आळवणी केल्यास प्रभावी आहे. कार्बेंडाझिम, फिप्रोनिल, फ्लुक्लोरानिलवर आधारीत अन्य उत्पादांचा वापर करुनही रोगाचा प्रसार सीमित केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

फ्युसारियम सोलानी नावाची बुरशी झाडांच्या वाहक भागात फोफावते, ज्यामुळे पाणी आणि पोषकांच्या वहनात बाधा येते. झाडांवर थेट संक्रमण मूळांच्या टोकाद्वारे किंवा जखमांतुन होऊ शकते. एकदा का जंतुंनी त्या भागात ठिय्या मांडला कि तिथे ती अनेक वर्षांपर्यंत सक्रिय राहू शकते कारण ती तिथेच विश्रांती घेणारे बीजाणू निर्माण करते. मातीजन्य रोगाचे जंतु जमिनीत रहातात आणि बियाणे, माती, पाणी, रोप, कामगार, सिंचनाचे पाणी आणि वारा (रोपाच्या संक्रमित सामग्रीची ने-आण केल्याने) पसरतात. बुरशी हा रोगकारक गंभीर जंतु आहे जो विविध प्रकारच्या यजमानांना प्रभावित करतो. जर फुलधारणेच्या काळात संक्रमण झाले तर उत्पादनात मोठी घट अपेक्षित असते. खोडावरील कँकर्समुळे (देवीच्या व्रण) पाणी आणि पोषण झाडाच्या वरच्या भागात पोचत नाही त्यामुळे ते भाग मरगळतात आणि अखेरीस झाडाची मर होते. फ्युसारियम सोलानी मृत किंवा मरत असलेल्या झाडांच्या अवशेषात घर करते आणि रात्री सक्रियतेने बीजाणू सोडते. जमिनीतील जास्त सापेक्ष आर्द्रता आणि मातीचे तापमान ही बुरशीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. पाणी निचरा चांगला नसणे किंवा जास्त पाणी देणेही रोगाच्या प्रसारास पूरक आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध प्रतिकारक वाणांतुन फक्त निरोगी आणि प्रतिकारक वाणेच जसे कि फुले ज्योती आणि फुले मुक्ता लावा.
  • मरगळ किंवा खोडांवरील डागासारख्या लक्षणांसाठी झाडांचे निरीक्षण करा.
  • प्रभावित झाड हाताने काळजीपूर्वक उपटून काढा.
  • ते जमिनीत खोल पुरून किंवा दूर नेऊन जाळुन नष्ट करा.
  • उपकरणे आणि हत्यारे खास करुन जर विविध शेतात वापरीत असाल तर ते स्वच्छ ठेवा.
  • शेतात काम करताना झाडांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • पिकाची स्वच्छ उपकरणांनी छाटणी करुन आणि शेतात स्वच्छता राखुन रोगाचे नियंत्रण करण्यात मदत करा.
  • जमिनीचा सामू ६.५-७ राखण्यासाठी अमोनियमच्या ऐवजी नायट्रेटचा वापर करा कारण नत्राच्या स्त्रोतामुळे रोगाची गंभीरता कमी होते.
  • हरितगृहात तंतोतंत सुस्थीत ठिबक सिंचन वापरा.
  • खतांची जास्त तीव्रता टाळा.
  • काढणीनंतर झाडांचे अवशेष काढुन जाळा.
  • लक्षात ठेवा कि साठवणीतही कूजणे चालूच रहाते.
  • गादीवाफ़्यांना काळ्या प्लास्टिकच्या आवरणाने थेट उन्हाखाली एक महिन्यासाठी ठेऊन निर्जंतुक करा.
  • बुरशीची जमिनीतील पातळी कमी करण्यासाठी पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा